Anna Bansode Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anna Bansode : अजितदादांनी अण्णा बनसोडेंवर सोपवली आणखी एक जबाबदारी; भरणेंसोबत आखणार सोलापुरातील विजयाची गणिते

Solapur NCP Joint Co-ordinator News उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीचे राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांना सोलापूर सहसंपर्क प्रमुखपदी नेमले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा प्रयत्न.

Vijaykumar Dudhale
  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना सोलापूरचे सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्त केले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

  2. सोलापूरच्या जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून ही नियुक्ती करण्यात आली असून, बनसोडे यांच्यासह दत्तात्रेय भरणे यांच्यावर निवडणूक रणनीतीची जबाबदारी असेल.

  3. भाजपमध्ये झालेल्या नेत्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाची लढाई उभी राहिली आहे, त्यामुळे नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांवर चांगली कामगिरी करण्याचे मोठे आव्हान आहे.

Solapur, 07 November : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेचे उपाध्यक्ष तथ पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली होती, त्यानुसार पक्षाने सोलापूरच्या सहसंपर्क प्रमुखपदी बनसोडे यांची नियुक्ती केली आहे.

मुंबईतील वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोलापूर (Solapur) शहर आणि जिल्हा निवडणुकीच्या संदर्भाने आढावा बैठक पार पडली होती. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक सामाजिक समीकरण पाहता त्या बैठकीत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांच्या जोडीला सहसंपर्कमंत्री म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

सोलापूरमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे (Anna Bansode ) यांच्या नावाला संमती दिली. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, संपर्कमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या जोडीला सहसंपर्कमंत्री म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माढा तालुक्यातील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपुढे अस्तित्वाची लढाई असणार आहे, त्यातच २०१७ पासून संधी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते बाह्य मागे सरसावून तयारीत आहेत. अशा वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे चॅलेंज दत्तात्रेय भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्या खांद्यावर असणार आहे.

जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, सोलापूर शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेशचे उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ज्येष्ठ नेते तौफिक शेख यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. आता या पदाधिकाऱ्यांवर आगामी निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सध्या सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत संपर्कमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याबरोबर सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे हेही सोलापूरच्या निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. या नियुक्तीनंतर सर्वच पदाधिकाऱ्यांंनी निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Q1. अण्णा बनसोडे यांना कोणती नवी जबाबदारी देण्यात आली आहे?
A1. त्यांना सोलापूरचे सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Q2. ही नियुक्ती कोणी केली?
A2. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली.

Q3. या नियुक्तीमागील उद्देश काय आहे?
A3. सोलापूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करणे हा उद्देश आहे.

Q4. अण्णा बनसोडे यांच्यासोबत कोण काम पाहणार आहेत?
A4. संपर्कमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासोबत ते निवडणुकीची रणनीती आखणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT