Laxman Hake : आमच्याकडं माणसं नाहीत का? तू आरं तुरं बोलू नको : पंढरपुरात हाके अन्‌ मराठा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा, एकमेकांच्या अंगावर धावून गेले

Laxman Hake-Maratha Kranti Morcha Activist Clashes: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्या कटाच्या आरोपानंतर पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून संभाव्य अनर्थ टाळला.
Maratha Kranti Morcha
Laxman Hake-Maratha Kranti MorchaSarkarnama
Published on
Updated on
  1. पंढरपुरात मराठा आरक्षणावरून तणावाची स्थिती निर्माण झाली, जेव्हा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांच्यात जोरदार वाद झाला.

  2. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि परिस्थिती गंभीर बनली.

  3. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला, आणि वातावरण पुन्हा नियंत्रणात आणण्यात आले.

Pandharpur, 07 November : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपावरून राज्याचे वातावरण तापलेले असतानाच पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे आज (ता. 07 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पंढरपुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर हाके हे उभे होते. त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर आणि त्यांचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी दाखल झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज पंढरपुरात आले असता त्यांच्यासमोरच मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha ) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा तरंगे पाटील आगे बढो अशी घोषणाबाजी केली. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्या वेळी हाके हे एकटे त्या ठिकाणी होते.

Maratha Kranti Morcha
Satara Politic's : मकरंद पाटलांकडून शशिकांत शिंदेंना धोबीपछाड; जिल्हाध्यक्षांसह दोन बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मराठा क्रांती मोर्चाच्या घोषणाबाजीनंतर धनगर समाजाचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी दाखल झाले. त्यात माऊली हाळवणकरही होते. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये शताब्दीक वादावादी झाली. हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली.

एकमेकांचा एकेरी उल्लेख करून दोन बाजूंनी हमरीतुमरी सुरू होती, त्यामुळे वातावरण संतप्त झाले होते. तुमच्या प्रेसच्या वेळी आम्ही घोषणाबाजी केली का, असा हाके यांनी केला. त्यावेळी साखळकर यांनी आमचीही प्रेस होती, असे सांगितले. आताच का आला येथे, असे हाके म्हणताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हाके यांच्यावर हल्लाबोल केला.

Maratha Kranti Morcha
Satara Nagar parishad Election : शिवेंद्रराजे-उदयनराजेंची 'ऐतिहासिक' युती घोषणेपूर्वीच संकटात; नगराध्यक्षपदामुळे 'गेम' बदलणार?

मी आदरार्थी बोलतो, तू अरे तुरे बोलू नको, असे साखळकर यांनी म्हटले, त्यावर प्रेस चालू असताना घोषणा का दिल्या, असा सवाल हाकेंनी केला. त्यावर आम्ही घोषणा देणार, तू आरं तुरं बोलू नको, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सुनावले. आमच्याकडं माणसं नाहीत का, असा सवाल दोन्ही बाजूंनी करण्यात आला. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने दलाल, दलाल असा उल्लेख केला, त्यामुळे वातावरण तापले.

घोषणाबाजी आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे अनर्थ घडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Q1. पंढरपुरात कोणत्या दोन नेत्यांमध्ये वाद झाला?
A1. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्यात वाद झाला.

Q2. वादाचे कारण काय होते?
A2. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीमुळे वाद निर्माण झाला.

Q3. या घटनेत काही मोठा अनर्थ झाला का?
A3. नाही, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

Q4. ही घटना कुठे आणि केव्हा घडली?
A4. ही घटना पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहावर 07 नोव्हेंबर रोजी घडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com