Karad News
Karad News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : पुण्यातील झळा कराडपर्यंत! हडसपर येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला

Umesh Bambare-Patil

Karad News, 28 June : पुण्यातील (Pune) हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात येत आहेत.

अशातच शुक्रवारी (ता.28जून) रोजी पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोल्हापुर नाका येथे हिंदू समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. दरम्यान, काही काळानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आलं.

'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ, जय शिवराय', जय भवानी जय शिवाजी; अशा घोषणा देत कराडमधील (Karad) दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली.

हा मोर्चा दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयासमोरुन कोल्हापुर नाका मार्गे पंकज हॉटेल समोरील पुणे-बंगळुरु महामार्गावर नेण्यात आला. यावेळी आंदोलक महामार्गावर ठाण मांडून बसले होते. यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली. यावेळी उपस्थितांच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी पुणे (Pune) शहरात झालेल्या घटनेचा निषेध करुन यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक जगताप यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. महामार्ग रोखल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती. वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक पुर्ववत केली. मात्र, पुण्यातील या घटनेचे पडसाद राज्यभरात पोहोचल्यामुळे त्या आरोपीवर पोलिस काय कडक कारवाई करणार का? तसंच भविष्यात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासन काय खबरदारी घेणार? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT