Maharashtra Budget 2024 : अजितदादांचे शेतकऱ्यांसाठी 'मोठं गिफ्ट'; पूर्णपणे वीजमाफ

Maharashtra Budget 2024-2025 : विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतीपंपधारक शेतकऱ्यांना सुखवणारा ठरणार आहे. राज्यातल्या 46 लाख 6 हजार शेतीपंपधारक शेतकऱ्यांना पूर्णपणे वीजमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 Sarkarnama

Vidhan Sabha Monsoon Session : विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतीपंपधारक शेतकऱ्यांना लाॅटरी लावून गेला. अजित पवार यांनी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी विविध घोषणा केल्या.

नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्याला शेतकऱ्यांना नेहमीच मदत केली आहे, असे सांगून अजित पवार यांनी राज्यातल्या शेतीपंपधारक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातल्या 46 लाख 6 हजार शेतीपंपधारक शेतकऱ्यांना पूर्णपणे वीजमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातल्या शेतीपंप ग्राहकांकडे लक्ष वेधले. राज्यात एकूण 47. 41 लाख शेतीपंप ग्राहक आहेत. त्यांचा वीज वापर 38 हजार 247 दशलक्ष युनिट एवढा आहे. त्या वीजवापराची किंमत पाहिल्यास 33 हजार 46 कोटी रुपये इतकी आहे. शेतीपंप ग्राहकांना सरकार दरवर्षी 6 हजार 984 कोटी रुपये अनुदान देते. तसेच 9 हजार 500 कोटी रुपयांची क्राॅस सबसिडीच्या माध्यमातून थेट मदत करते. राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जेकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राबवण्यात येणार आहे. या योजनेत 9 हजार 200 मेगावाॅट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

Maharashtra Budget 2024
Ajit Pawar Maharashtra Budget 2024: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना वीज बिल माफ

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी 18 महिने कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यासाठी लागणारी जमीन सरकारकडे उपलब्ध असून, ती हस्तांतरीत केली आहे. राज्यातल्या शेतीपंपधारक शेतकऱ्यांना (Farmer) पूर्णपणे वीजमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा अजित पवार यांनी करताच सभागृहातील सदस्यांनी जल्लोष केला.

Maharashtra Budget 2024
Devendra Fadnavis - Uddhav Thackeray Meeting : 'ते' दोघे लिफ्टमध्ये एकत्र काय गेले, आपण काय काय गमावले ते कळले!

ई-पंचनामा लागू होणार

अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना खरीप हंगमामध्ये दुष्काळ परिस्थितीचे पंचनामा आणि सवलती देण्याचा आदेश दिल्याचे सांगितले. तसेच ई-पंचनामाची चाचणी यशस्वी झाल्याने ती राज्यात लागू करण्याची घोषणा केली. तसेच नमो शेतकरी योजना आणि एक रुपयात पिक योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनांचा लाभ दिला. महात्मा जोतिराव फुले पिक कर्ज योजने अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकचा लाभ देण्यात सरकार यशस्वी ठरल्याचे सांगितले.

गाव तिथे गोदाम

नानाजी देशमुख कृषी योजना मराठवाड्यात योजना राबवण्यात आली. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय योजना अंतर्गत प्रकल्पांना मंजुरी दिली. विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर 'गाव तिथे गोदाम', योजना राबवण्यात येणार. पहिल्या टप्प्यात 100 गोदामांचे बांधकाम आणि जुन्या गोदामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. कापूस, सोयाबीन तसेच तेलबियांच्या उत्पन्नात वाढ केली जाणार आहे. आधारभूत किंमतीनुसार शेतीमाल खरेदीसाठी 100 कोटींचा फिरता निधा उपलब्ध केला जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com