Uddhav Thackeray And Sanjay Raut : शिंदे सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणाऱ्या राऊतांना ठाकरे मोठं बक्षीस देणार, दिल्लीत 'हे' मोठं पद मिळणार

Shivsena UBT Political News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणारे, मोदी- शाह यांसह भाजपवर सडकून टीका करत ठाकरेंसह महाविकास आघाडीची बाजू भरभक्कम मांडणाऱ्या संजय राऊतांकडे आता दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray- Sanjay Raut
Uddhav Thackeray- Sanjay RautSarkarnama

Mumbai News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे दोन बलाढ्य पक्ष फोडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत सामोरे गेलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांसह महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली. आघाडीने तब्बल 31 जागा पटकावल्या तर महायुती मात्र चांगलीच बॅकफूटला गेली.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणारे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) आता उद्धव ठाकरे मोठं बक्षीस देण्याची शक्यता आहे. त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी बिर्लांकडे मोठी विनंती केली आहे. ठाकरे यांनी संजय राऊत यांची संसदीय पक्षनेतेपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.

तसेच अनिल देसाई यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती,याचसोबत पक्षाचा गटनेता म्हणून अरविंद सावंतांची नियुक्ती करावी अशी विनंती ठाकरेंनी केली आहे. राज्यसभेत संजय राऊत यांची गटनेता म्हणून नियुक्ती करावी असेही ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Eknath Khadse : मनाने भाजपमध्ये असणाऱ्या नाथाभाऊंचा सरकारवर भरोसा नाय का?

दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत बसले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पुढे शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळालं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत शिंदे-फडणवीस-पवार सरकारला सळो की पळो करुन सोडणारे, मोदी- शाह यांसह भाजपवर सडकून टीका करत ठाकरेंसह महाविकास आघाडीची बाजू भरभक्कम मांडणार्या संजय राऊतांवर आता दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंची खंबीर साथ दिली आहे. त्यांनी 104 दिवस तुरुंगवासही भोगला होता.नित्यनियमाने पत्रकार परिषद घेत ते केंद्रातील मोदी सरकार,राज्यातील महायुती सरकारवर ते हल्लाबोल करतात. त्यांच्या या पत्रकार परिषदा सरकारची डोकेदुखी ठरत असतात.आता राऊतांच्या याच कामगिरीचे बक्षीस म्हणून ठाकरेंकडून त्यांना दिल्लीत मोठं पद मिळण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
NCP MLA Meet Jayant Patil : होय, आमचे आमदार जयंत पाटलांना भेटले; पण... राष्ट्रवादी नेत्याचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात.लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह वारंवार याचा प्रत्यय आला आहे.आता ठाकरेंसोबत ते इंडिया आघाडीच्याही अनेक बैठकांना उपस्थित होते.संसदेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी आणि दिल्लीसह इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून ठाकरे आता राऊतांना पाठबळ देण्याच्या तयारीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com