Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बंदी असतानाही भाजप नेत्याचे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फोटोसेशन : फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरचिटणीस तथा पुण्याचे (Pune) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा पंढरपूर (Pandharpur) दौरा वादात अडकण्याची चिन्हे आहेत. पंढरपूरच्या मंदिरात शुटींग आणि फोटो काढण्यास मनाई असताना (अपवाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी महापूजा) मोहोळ यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतानाचे फोटो (Photo) व्हायरल झाले आहेत. केवळ मोहोळ यांचेच नव्हे तर त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचाही त्या फोटोत समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना सवलत का, असा सवाल उपस्थित होत आहे. (Despite the ban, BJP leader Murlidhar Mohol's photo session at Pandharpur's Vitthal temple)

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर असा पश्चिम महाराष्ट्राचा संघटनात्मक दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात इंदापुरातून केली. पुढे अकलूजला मोहिते पाटील यांचे स्वागत स्वीकारून भाजप नेते मोहोळ हे पंढरपुरात दाखल झाले. पंढरपुरात कार्यकर्त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन आपल्या नेत्याचे स्वागत केले. मात्र, त्यानंतर झालेला पंढरपूर दौरा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. पंढरपुरात आलेला प्रत्येक पुढारी हा परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरात जातो, त्याप्रमाणे मोहोळही मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

मुळात मंदिरात मोबाईल आणि इतर तत्सम वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. तसेच, फोटो काढणे आणि छायाचित्रीकरणासही प्रतिबंध आहे. असे असतानाही मोहोळे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फक्त मोहोळ यांचेच नव्हे तर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचेही मंदिरातील फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे खुद्द मोहोळ यांनीच ते फोटो आपल्या फेसबुक फेजवर व्हायरल केले आहेत. त्यामुळे हे फोटो कोणी काढले आणि त्यांना मंदिर समितीच्या लोकांनी का अडवले नाही, याची चर्चा होताना दिसत आहे.

मंदिर समिती आणि व्यवस्थापानाला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. यासोबत काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका ‘गोल्डमॅन’चा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. एरवी सर्वसामान्यांबाबत कठोर असणारी सुरक्षा यंत्रणा ठराविक लोकांबाबत मवाळ का होते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT