Mumbai, 10 July : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीअंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना पलटवार केला. सुपारीबाज, मिमिक्री आर्टिस्ट, स्टॅंडअप कॉमेडियन अशा शेलक्या शब्दांचा वापर करत फडणवीसांनी ठाकरेंना जोरदार टोले लगावले. राज ठाकरेंवर कडवट शब्दांत टीका करताना ‘ते आमचे चांगले मित्र आहेत,’ हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परवा मी विधानसभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. मिसिंग लिंकवरील पूल, ब्रीज आणि जगातील सर्वांत मोठ्या टनेलला एकही क्रॅक गेलेला नसताना ७ हजार कोटी पाण्यात गेले, असं सांगण्यात आलं. तो काय माझा अपमान आहे का?, तो महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे.
भाषणात मी हिंदीमध्ये ‘भाडे के टटू’ असं म्हणालो. त्याचं त्यांनाही दुःख झालं. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोललं पाहिजे. त्यामुळे मी अभ्यास केला. आता मी माझं ‘भाडे के टटू’ हे विधान परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. ‘भाटक गदर्भ’ हे कोणाला समजलं नसेल, तर मग सुपारीबाज...पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो. मी टोपी फेकली होती. ते अनेकांना का लागली?, हे समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली, असा टोला फडणवीस यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पण ते जाऊ द्या. मी हिंदीत एक वाक्य बोललो. ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो. पण ते राहिले बाजूला. पण मिरची दुसऱ्यालाच लागली आणि आमचे ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणायला लागले की हिंदीत का बोलले? संपूर्ण भाषण मी मराठीतच केलं आहे. पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत. ते मित्र असल्यामुळे राजकारणात तरी आम्हाला काही त्यांच्यापासून धोका नाही.
राज ठाकरे यांचे नाव न घेता ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकालाही स्टॅंडअप कॉमेडियन मार्केट राहिलं नसतं. पण काही हरकत नाही. आजही त्यांना मिरची लागू शकते, असे सांगून फडणवीस यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.