Solapur DCC Bank : सोलापूर DCC बॅंकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार; निवडणूक प्राधिकरणाचा मतदारयादीबाबत मोठा निर्णय

Voter List Issue : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२६ ही अहर्ता तारीख निश्चित झाली आहे. त्यानुसार मतदार याद्या तयार होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
Solapur DCC Bank
Solapur DCC Bank Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 July : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२६ ही अहर्ता तारीख (कट ऑफ डेट, या तारखेपर्यंत निकष पूर्ण करणाऱ्यांनाच प्रत्यक्ष मतदान करता येणार आहे) निश्चित केली असून त्यानुसार मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. या याद्या प्रथम विभागीय सहनिबंधकांना बँकेच्या वतीने सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी अहर्ता तारखेचे पत्र बँकेचे प्रशासक, सहकार विभागाचे पुणे विभागीय निबंधक यांना पाठविले आहे. या पत्रामुळे बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ २०१८ मध्ये बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात अनेक सोसायट्यांनी निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नव्हते. या पत्रामुळे संचालक मंडळ बरखास्तीनंतर तब्बल आठ वर्षांनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील बावची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात गेली होती. या सोसायटीच्या याचिकेवरील सुनावणी १ जुलै रोजी झाली होती. त्या सुनावणीत न्यायालयाने प्रशासकांना कडक निर्देश दिले होते.

Solapur DCC Bank
Historic Decision : सोलापूरसाठी ऐतिहासिक निर्णय; सुशीलकुमार शिंदेंचे नाव घेत बावनकुळेंची घोषणा, 118 वर्षांपासूनचा प्रश्न मिटला...

एक आठवड्याच्या आत निवडणुकीच्या वेळापत्रकासह पुढच्या सुनावणीला हजर राहावे. तुम्ही हे काम केले नाही तर प्रशासकाची हकालपट्टी करून त्या ठिकाणी नव्या प्रशासकाची नेमून निवडणुका घेण्यात येतील, असे बॅंकेला सुनावले होते. त्यासाठी पुढील सुनावणीची तारीख ८ जुलैला दिली होती. मात्र, ८ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. मात्र, प्राधिकरणाने तत्पूर्वीच ६ जुलै रोजी पत्र काढून मतदार यादी तयार करण्यासाठी अहर्ता तारीख निश्‍चित केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने निवडणुकीसंदर्भात कडक ताशेरे ओढल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधकांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अर्हता तारीख ठरविण्याची विनंती केली होती. त्यानुसार निवडणूक प्राधिकरणाने ६ जुलै रोजी १ जुलै २०२६ रोजीची तारीख मतदार यादी निश्‍चितीसाठी ठरवली आहे.

Solapur DCC Bank
Collector Order To BLO : बीएलओंना जिल्हाधिकाऱ्यांची सक्त ताकीद : ‘मतदारांना तुमच्याकडे बोलावू नका; तुम्ही त्यांच्या घरी जा’

जिल्हा बँकेकडून याद्या सादर झाल्यानंतर प्रारूप याद्या प्रसिध्दी, दावे व हरकतींचा कालावधी, हरकतींवर सुनावणी व अंतिम मतदार यादी प्रसिध्दी हा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर संचालक मंडळासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. प्रक्रिया अशीच सुरू राहिल्यास साधारणता ऑक्टोंबर/नोव्हेंबरमध्ये संचालक मंडळासाठी प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com