BJP Politics : दिल्लीत मोठी राजकीय घडामोड; नगरसेवक, नेते नव्हे पक्षच झाला भाजपमध्ये विलीन, 'आप'शी कनेक्शन

Indraprastha Vikas Party, IVP, IVP joins BJP : आम आदमी पक्षाची राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता दिल्ली महापालिकेतही मोठी नामुष्की ओढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Delhi politics : दिल्लीच्या राजकारणात शुक्रवारी मोठी राजकीय घडामोड घडली. राज्यात सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने महापालिकेवरही वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने नेते, नगरसेवक न फोडता अख्या पक्षच सोबत आणला आहे. हा पक्ष शुक्रवारी सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये विलीन झाला.

आम आदमी पक्षातून १४ महिन्यांपूर्वी बाहेर पडत १६ नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. या सर्व १६ नगरसेवकांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. त्यामुळे महापालिकेत भाजपची ताकद वाढली आहे.

दिल्लीत मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव झाला होता. पक्षाच्या हातून सत्ता गेल्यानंतरच तीनच महिन्यांत १६ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत नवा पक्षा स्थापन केला होता. परिणामी आपच्या हातून महापालिकेची सत्ताही गेली. आता पुढीलवर्षी महापालिकेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर १६ नगरसेवकांनी भाजपमध्ये विलीन होत तिकीट पक्के केल्याचे मानले जात आहे.

BJP
सत्ता कुणाचीही असो, 'या' महिला नेत्याची खासदारकी फिक्स; भाजपलाही भूरळ...

आयव्हीपी पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याने भाजपच्या नगरसेवकांचा आकडा आता १३९ वर पोहोचला आहे. दिल्ली महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या २५० एवढी आहे. त्यामुळे आता भाजपकडे एकहाती बहुमत आले आहे. यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांची संख्या १२३ होती. तर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी भाजपचे केवळ १०४ नगरसेवक निवडून आले होते. आम आदमी पक्षाने त्यावेळी विजय मिळवत सत्ता काबीज केली होती.

BJP
BJP news : भाजपचा ट्रिपल धमाका; तीन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कमळ घेतले हाती...

आम आदमी पक्षाची राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता दिल्ली महापालिकेतही मोठी नामुष्की ओढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी काही नगरसेवक निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिल्लीतील आम आदमी पक्ष आणखी खिळखिळा होऊ शकतो. पक्षाच्या स्थापनेनंतर दिल्लीतच पहिल्यांदा सत्ता मिळाली होती. आता तिथेच पक्षाची वाताहात होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com