Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Fadnavis On Sanjay Gaikwad : फडणवीसांनी शिंदेंच्या आमदाराला सुनावले; ‘त्यांनी पुस्तक वाचलंय की नाही मला महिती नाही, चर्चेत राहण्याचा प्रयत्न योग्य नाही’

Shivaji Kon Hota Book Controversy : संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला असून प्रकाशकावर शिवीगाळ केल्याने संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 April : गेल्या काही दिवसांपासून बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना केलेली शिवीगाळ यावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी कम्युनिस्ट आणि पुरोगामी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, तर गायकवाड यांनी पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजूंचे कान टोचले असून आमदार गायकवाड यांनाही अप्रत्यक्षरित्या सुनावले आहे.

बार्शीच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगवंतांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना केलेली शिवीगाळ यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर आज कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी कोण होता?, या पुस्तकावरून निरर्थक वाद निर्माण करण्यात आलेला आहे. देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अपमान कोणीही करू शकत नाही. त्यांचा मान इतका मोठा आहे, कोणीही त्यांचा अशा पद्धतीने अपमान करणं शक्यच नाही.

कॉ. गोविंद पानसरे यांनी १९७९ मध्ये हे शिवाजी कोण होता, हे पुस्तक लिहिले आहे. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात भिडायचं, हे शुद्ध असमाजिक आणि असंवेदशातील कृत्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आक्षेप घेणाऱ्यांनी शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचलं आहे की नाही, हे मला माहिती नाही. आंदोलन करणाऱ्यांना आपण आंदोलन कशासाठी करतोय, हे माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही. केवळ कुठलातरी मुद्दा उचलायचा, त्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न, हे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी माजी आमदार गायकवाड यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT