Devendra Fadnavis Barshi Tour : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बार्शी दौऱ्यात माजी आमदार राजेंद्र राऊतांना मोठे गिफ्ट देणार?

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बार्शीत भगवंत महोत्सवासाठी येत आहेत. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी ते काही मोठी घोषणा करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis-Rajendra Raut
Devendra Fadnavis-Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 April : विधान परिषद निवडणुकीचे पडघम राज्यात जोरजोरात वाजत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या मंगळवारी (ता. 28 एप्रिल) भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने बार्शीच्या दौऱ्यावर येत आहेत. तब्बल 04 वर्षांनंतर बार्शी येणारे फडणवीस माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी गोड घोषणा करणार का, याची उत्सुकता बार्शीकरांना लागली आहे.

विधान परिषदेतील नऊ जागा रिक्त झाल्या असून त्यात पाच जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वाट्याला येतात. त्या जागेवर सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागते? हे पाहावे लागणार आहे. कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत (Rajendra Raut), राम सातपुते आणि शहाजी पवार यांची नावे चर्चेत आहेत. पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माघार घेताना परिचारक यांना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक हे विधीमंडळात दिसतील, असा शब्द दिला होता. मात्र, अजूनही तो शब्द पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पहिला क्लेम हा परिचारकांचा असल्याचे मानले जात आहे.

विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यशैलीत बदल करत बार्शी बाजार समिती, नगरपालिकेपाठोपाठ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे पक्षाला सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारे राजेंद्र राऊत यांचे नावही विधान परिषदेसाठी चर्चेत आहे.

Devendra Fadnavis-Rajendra Raut
Manohar Bhosale : उंदरगावनंतर मनोहरमामाचा घोटीत 22 एकरांवर आश्रम;‘समृद्धी’मध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या बड्या अधिकाऱ्याची हेलिकॉप्टरने हजेरी!

माजी आमदार राऊत यांचे नाव चर्चेत असले तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शी तालुक्याला देण्यात आलेले आहे, त्यामुळे राऊत यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. पण, सदस्य नाेंदणीसह निवडणुकांमध्येही भाजपला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या राऊत यांना बार्शीच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस हे विधान परिषदेचे गिफ्ट देणार का, याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis-Rajendra Raut
Bageshwar Baba Statement : शिवरायांबद्दल बरळणाऱ्या बागेश्वर बाबांचा काँग्रेस नेत्याने घेतला खरपूस समाचार : ‘इतिहास बदलण्याचा कट, हे राँग नंबरवाले,भेंदूबाबाचे पीक भाजपमुळेच..

भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने येणारे देवेंद्र फडणवीस हे बार्शीसाठी नवी कोणती घोषणा करणार, याचीही उत्सुकता बार्शीकरांना आहे. भगवंत मंदिरास ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून होणार का, याबाबतही उत्कंठता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com