DYCM in Mauli palanquin sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan News : देवेंद्र फडणवीस यांनी केले माऊलींच्या पालखीचे सारथ्य

Umesh Bambare-Patil

Phaltan News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बरड (ता.फलटण) येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्यही केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis हे दोन दिवसाच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. कराडातील विविध कार्यक्रम उरकून आज दुपारी त्यांनी फलटण Phaltan तालुक्यातील बरड येथे जाऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्या समवेत साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.

हरी नामाच्या गजरात आणि लाखो भाविक वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी मजल दर मजल करत आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे. माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्काम असून उद्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT