Karad News : पंढरपुरात या पण, राजकारण करु नका : फडणवीसांचा केसीआर यांना टोला

Devendra Fadanvis तेलंगणाचे मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रीमंडळ घेवुन पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले
Devendra Fadanvis, K Chandrashekhar Rao
Devendra Fadanvis, K Chandrashekhar Raosarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad BJP News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे संपूर्ण मंत्रीमंडळ घेवुन पंढरपुरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यापार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कोणीही येऊ शकत. तेथे भक्तीभावाने या, पण राजकारणासाठी कोणी येऊ नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री राव यांना लगावला.

उपमुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadanvis आज गुरुवारी कऱ्हाडच्या (जि.सातारा) दौऱ्यावर होते. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले Atul Bhosale आदी उपस्थित होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव संपूर्ण मंत्रीमंडळ घेवुन पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कोणालाही पंढरपुरला येता येईल. तेथे सर्वांचे स्वागत आहे.

Devendra Fadanvis, K Chandrashekhar Rao
KCR On Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंसाठी खास विमान का पाठविले होते?; केसीआर यांनी सांगितले कारण…

मात्र, राजकारणासाठी कोणी येवु नये. भक्तीभावाने तेथे आले पाहिजे. त्या भावनेने तेथे कोणीही येत असेल तर त्यांचे तेथे स्वागतच आहे, असा टोला लगावला.

Devendra Fadanvis, K Chandrashekhar Rao
Satara News : ती जागा माझ्या मालकीची; शिवेंद्रसिंहराजे, मार्केट कमिटीचा संबंध नाही : उदयनराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com