Attack on Heramb Kulkarni  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Attack on Heramb Kulkarni : हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण : फडणवीसांकडून दखल अन्...

अनुराधा धावडे

प्रदीप पेंढारे

Nagar Crime News : सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा पूर्वनियाेजित हाेता. त्यांना जिवे मारण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली हाेती, असे पाेलिस तपासात समाेर आले आहे.

या सुपारी हल्ल्याची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, नगर शहरांच्या शाळेभाेवती, अनधिकृत आणि गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या टपऱ्यांवर कारवाईच्या सूचना जिल्हा पाेलिस प्रमुखांना दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कारवाईच्या केलेल्या सूचनांच्या माहितीला भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दुजाेरा दिला आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यात ताेफखाना पाेलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शाळेभाेवती असलेली मावा-सुगंधी तंबाखू विकणारी टपरी हटविण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली हाेती. यानंतर हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला पूर्वनियाेजित हाेता. त्यासाठी हल्लेखाेरांना 15 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली हाेती. हे पाेलिस तपासात आता उघड झाले आहे.

हल्लेखाेरांच्या या सुपारी प्रकारावर हेरंब कुलकर्णी यांनी फेसबुकवर पाेस्ट शेअर केली आहे. 'माझ्या जगण्याची किंमत... मारणारे पाच जण. प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकी तीन हजार रुपये आले आहेत. इतक्या अल्प रकमेसाठी एखाद्याचा जीव घ्यावासा वाटताे... अनाकलनीय', असे हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी या सुपारी हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. नगर जिल्हा पााेलिस प्रमुखांना संपर्क साधून नगर शहरातील अवैध, अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच हल्लेखाेर काेण असतील, हे माहीत नाही. परंतु हल्लेखाेरांवरील कारवाईत काेणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असेही सुनावले आहे. याचबराेबर जखमी हेरंब कुलकर्णी यांची नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे आज (११ ऑक्टोबर) भेट घेणार असल्याची माहिती भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT