Solapur, 07 February : तुम्हाला एक विनंती आहे की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदार नाहीत, असे लोक यशवंतनगर मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतमध्ये उभे राहून मतदारांवर दबाव टाकत आहेत. शंभर मीटरच्या आतमध्ये भाजपचे पदाधिकारी उभे आहेत, हे काय लावलं आहे? अशा शब्दांत खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे पोलिसांवर भडकले.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil )म्हणाले, वेळापूर जिल्हा परिषद गटातील यशवंतनगर गणातील मतदान केंद्राचा शंभर मीटर परिसर पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल की, ज्यांच्या या मतदारसंघाशी काय संबंध नाही, असे भारतीय जनता पक्षाचे लोक सत्तेचा गैरवापर कसा करावा, कायदा कसा धाब्यावर बसवावा आणि दहशत निर्माण करण्यासाठी भाजपचे अकलूज शहराध्यक्ष हे यशवंतनगर मतदान केंद्राच्या शंभर मीटर लाईनच्या आतमध्ये येऊन थांबले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान झाले. पण, अकलूज शहरातील भाजपचे (BJP) शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य यशवंतनगर मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतमध्ये येऊन थांबले आहेत. ते मतदारांवर दहशत निर्माण करीत आहेत आणि पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. वास्तविक ते मतदारच नाही. कोणत्या पद्धतीची दहशत माजविण्याचा प्रयत्न हे मंडळी करतात, हे मला समजतच नाही, असेही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, एवढाच त्यांना कॉन्फिडन्स असेल तर त्यांनी घरी बसून बघावं. प्रत्येक बूथच्या बाहेर भाजपचे लोक लॅपटॉप घेऊन बसले आहेत. एक वेगळा प्रकार करण्याचे काम माळशिरस तालुक्यात सुरू आहे. आपलं काम बोलतंय, असा त्यांना विश्वास असेल तर ते कोणत्या पातळीवर जाऊन हे सर्व करायला लागले आहेत, हे दिसून येते. भाजपची हार इथेच लक्षात येऊ लागली आहे.
काही छोट्या मशीन आमच्या काही लोकांनी पकडल्या आहेत. पण, पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग काही विशेष कारवाई करताना दिसत नाही. तरीही आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढणार आहोत, असेही खासदार मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.