NCP Vs BJP : कराडमध्ये भाजप अन्‌ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; वडगाव हवेलीत बोगस मतदानाचा मुद्दा तापला

Satara Zilla Parishad Election 2026 : सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समिती निवडणुकीदरम्यान वडगाव हवेली येथे बोगस मतदानाच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
Karad BJP-NCP Activist
Karad BJP-NCP Activist Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 07 February : सातारा जिल्हा परिषद आणि कऱ्हाड पंचायत समिती निवडणुकीसाठी आज (ता. 07 फेब्रुवारी) शनिवारी मतदान सुरु असतानाच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे वादावादी झाली. बोगस मतदानाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

बोगस मतदानाच्या कारणावरुन भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरु होती. त्याच वेळी कार्यकर्त्यांची तेथे मोठी गर्दी झाली. त्यामुळे वडगाव हवेली केंद्र परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज शनिवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे, त्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कऱ्हाड (Karad) तालुक्यातील ४८६ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळच्या टप्यात धिम्या गतीने सुरु असणाऱ्या मतदानाने दहानंतर वेग घेतला आहे. सकाळी दहानंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी साडेसात ते दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत २१.६३ टक्के मतदान झाले आहे.

Karad BJP-NCP Activist
Karad News : आधी लगीन लोकशाहीचं; मग स्वतःचं; मतदान करूनच नवरदेव चढला बोहल्यावर....

दरम्यान या निवडणुकीच्या मतदानात वडगाव हवेली येथे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थकांमध्ये बोगस मतदानावरुन हमरीतुमरी झाली. बोगस मतदानाच्या कारणावरुन काही काळ वाद सुरु राहिला. त्याबाबतची माहिती समजताच दोन्ही बाजूच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती.

Karad BJP-NCP Activist
Murlidhar Mohol : विमान अपघात प्रकरण: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये! केंद्राकडे केली 'ही' मोठी मागणी; मुरलीधर मोहोळांची माहिती

उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे वडगाव हवेली येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये या वादाची जोरदार चर्चा सुरु होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com