Viral Political audio : झेडपी निवडणुकीच्या मतदानादिवशीच माजी मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल; म्हणाले, '50 लाख, कोटभर वा दोन कोटी जाऊ देत...'

Dharashiv Zilla Parishad election News : आता मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सर्वच पक्षात लागली आहे.
Audio Clip Viral
Audio Clip Viralsarkarama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीत चुरस आहे. याठिकाणी माजी पालकमंत्री तानाजी सावंत, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जिल्हयात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.

त्यातच आता मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सर्वच पक्षात लागली आहे. त्यातच शनिवारी मतदानादिवशी 'पैशावर किती मतदार घेता येतील, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका,' अशाप्रकारची वक्तव्य असलेली माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

भूम परंड्याचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) प्रचार कामात व्यस्त होते. त्यातच मतदानाच्या पूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाची त्यांचे ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कोटी-दोन कोटी खर्च करण्यासही हरकत नसल्याचे स्पष्टपणे ऐकू येत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Audio Clip Viral
Pravin Darekar BJP : राष्ट्रवादीचं स्टिअरिंग तटकरे-पटेलांकडे? प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं भाजपचा ‘गेमप्लॅन’ उघड!

या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पैशाबाबतची चर्चा थेट व्हॉट्सॲपवर करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्याला केले असल्याचे ऐकू येत आहे. पैशावर किती मतदार घेता येतील, हिंगणगावमध्ये किती शक्यता आहे, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका, अशा स्वरूपाच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचा दावा केला जात आहे.

Audio Clip Viral
Shivsena UBT : 'मोदींवर ट्रम्प यांचा प्रचंड दबाव, सर्व अटी-शर्ती मान्य; अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी भारताला गुलाम बनवले...'; ठाकरेंचा हल्लाबोल

शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही, तिथे कोणताही कॉम्प्रमाईज करायचा नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याचे या क्लिपमध्ये नमूद आहे. या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही. मुस्लिम आणि दलित वस्त्यांतील मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी या ऑडिओमधून दिल्याचे ऐकू येते. “50 लाख जावो, कोटभर जावो, दोन कोटी जाऊ देत,” असे म्हणत खर्चाच्या मर्यादेची कोणतीही अडचण नसल्याचे कथित विधान या ऑडिओत ऐकू येते.

Audio Clip Viral
BJP mayor candidate controversy : सुरुवात झाली अन् सत्तेआधीच दुही माजली! भिवंडीत भाजपमध्ये ‘इनसाईड गेम’ रंगणार

त्यासोबतच संवेदनशील मतदारसंघ असल्याचे सांगत कोणाचाही विचार न करता याद्या तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणाशीही चर्चा न करता, एक शब्दही बाहेर न जाता सर्व माहिती फक्त व्हॉट्सॲपवर पाठवण्याचे आदेश दिल्याचेही या संभाषणात ऐकू येत आहे. त्यासोबतच सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका, लागेल ते मला सांगा, मी बरोबरच आहे, असे सांगत संपूर्ण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला जात आहे.

Audio Clip Viral
NCP Internal Politics : 'अनसिक्युअर कोण?' नीलेश लंकेंच्या एका वाक्यानं राष्ट्रवादीत संशयाचं वादळ!

निवडणूक आयोग काय कारवाई करणार ?

या कथित ऑडिओ क्लिपमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या सर्व प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Audio Clip Viral
Congress Shiv Sena UBT Alliance : महापौर निवडणुकीआधी ट्विस्ट, स्वीकृतसाठी सस्पेन्स अन् एमआयएमविरोधात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com