Dhairyasheel Mohite Patil- Uddhav Thackeray
Dhairyasheel Mohite Patil-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; कारण घ्या जाणून...

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 June : माढा लोकसभा मतदारसंघातून तब्बल सव्वा लाखाच्या फरकाने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (ता. १४ जून) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने केलेल्या मदतीबाबत मोहिते पाटील यांनी ठाकरेंचे विशेष आभार मानले.

माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटला होता. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी दिली होती. तत्पूर्वी पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजला शिवरत्न बंगल्यावर निवडणूक स्ट्रॅटेजी ठरवली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी करण्यात आली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यात भाजपला (BJP) धूळ चारली.

महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला खंबीर साथ दिली. शिवसेना पक्षाची मते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळती करण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे मानले जाते. त्यामुळे मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मदत झाली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगली साथ दिली. त्यानिमित्त मोहिते पाटलांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. मातोश्रीवर मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे विशेष आभार मानत सत्कार केला.

याबाबत धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने माढा लोकसभा मतदारसंघातमनापासून काम केले; म्हणूनच मला मोठे मताधिक्य मिळाले. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या अपेक्षापूर्तीसाठी माझी खासदारकी असेल. मतदारसंघातील पाणी, वीज, रस्ते, उद्योग आणि मुलभूत शिक्षणासाठी माझी खासदारकी समर्पित असणार आहे.

या वेळी शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे, युवा जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, तालुका प्रमुख संतोष राऊत, अरविंद पाटील, बंडू घोडके, अकलूज शहरप्रमुख कमृद्दिन खतीब, तुषार इंगळे, महादेव बंडगर व इतर उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT