Chhagan Bhujbal Upset In NCP : छगन भुजबळांना राज्यसभेवर न पाठविण्याचे मुश्रीफांनी फोडले गुपित

Hasan Mushrif On Rajya Sabha Election : भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात फार मोठी गरज आहे. इतर मागास वर्गीयांचा (ओबीसी) चेहरा म्हणून भुजबळ राज्यात प्रसिद्ध आहेत.
Hasan Mushrif -Chhagan Bhujbal
Hasan Mushrif -Chhagan BhujbalSarkarnama

Kolhapur, 14 June : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी नाव चर्चेत असूनही छगन भुजबळ यांना संधी मिळाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसभेवर संधी न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत, अशी चर्चा सुरू असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांना राज्यसभेवर का पाठविले नाही, यामागचे मोठे कारण उघड केले आहे.

कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भुजबळ यांना राज्यसभेवर न पाठविण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठविले नसल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झालेले नाहीत. भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात फार मोठी गरज आहे. इतर मागास वर्गीयांचा (ओबीसी) चेहरा म्हणून भुजबळ राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे.

छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात फार मोठी गरज आहे. त्यामुळे त्यांनी राज्यसभेवर जाऊ नये, असा आमचा आग्रह होता. आमचा आग्रह पाहूनच छगन भुजबळ यांनी अतिशय आनंदाने सुनेत्रा पवार यांचं नाव घेतलं आणि ते अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते, असा दावा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

दिल्लीच्या राजकारणात जाण्यासाठी छगन भुजबळ हे इच्छूक होते, त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आपली वर्णी लागावी, अशी भुजबळ यांची इच्छा होती. मात्र, इतरही नेते इच्छूक असल्यामुळे कोणीही नाराज होऊ नये, यासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.

Hasan Mushrif -Chhagan Bhujbal
Ajit Pawar-Anna Hazare : अजित पवारांच्या अडचणी वाढणार; अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला आव्हान

वास्तविक, लोकसभा निवडणुकीतही छगन भुजबळ हे नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही तशी इच्छा होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकवरील आपला हक्क सोडला नाही, त्यामुळे नाशिकमधून भुजबळ यांनी माघार घेतली होती.

लोकसभेची संधी हुकल्यामुळे छगन भुजबळ यांना राज्यसभेवर आपली वर्णी लागेल, अशी आशा होती. मात्र, राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर हसन मुश्रीफ यांनी पडदा टाकताना भुजबळ यांची आम्हाला महाराष्ट्रात गरज आहे, त्यामुळे त्यांनी राज्यसभेवर जाऊ नये, असे आम्हा सर्वांना वाटत होते, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif -Chhagan Bhujbal
Pandharpur Politics : पंढरपूरचे नेते लागले आमदारकीच्या तयारीला...जनतेसाठी मोबाईल नंबरही जाहीर केला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com