Manoj Jarange Patil-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil Meets Jarange : धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; मराठा आरक्षणासंदर्भात केले मोठे विधान, म्हणाले, ‘वेळप्रसंगी घटनादुरुस्ती....’

Maratha reservation : मराठा आरक्षणाचा विषय आता जास्त न ताणता सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात.

Vijaykumar Dudhale

Mumbaim 31 August : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातील राजकीय नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेऊन ‘वेळप्रसंगी घटना दुरुस्तीची वेळ आली तर कायदेतज्ज्ञ आणि सरकारने निर्णय घ्यावा’ असे आवाहन केले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या मागण्या गेल्या काही वर्षांपासून मांडत आहेत. माझी सरकारला विनंती राहील की, वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्याची वेळ आली तर सर्व पक्षांनी मिळून एकत्रितपणे मराठा आरक्षण कसं मिळेल, याबाबत सरकार आणि कायदेतज्ज्ञांनी निर्णय घ्यायचा आहे.

मराठा आरक्षणाचा विषय आता जास्त न ताणता सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही मोहिते पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी ‘मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही,’ असे विधान केल आहे. त्यावर खासदार मोहिते पाटील म्हणाले, जमिनीवर फिरल्यावरच लोकांच्या लक्षात येतं. मराठा समाजातील लोकांच्या काय अडचणी आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत. सरकारमधील प्रत्येक मंत्र्याने फिरून बघावं, मराठ्यांची काय अवस्था आहे. कागदोपत्री बोलण्यापेक्षा खाली वास्तव परिस्थिती काय आहे. मराठा समाज कसा जगतोय, हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मी लेखी पत्र दिलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे तशी पत्राद्वारे मागणीही केलेली आहे. मराठा आरक्षणाचा विचार गांभीर्याने करावा आणि हा प्रश्न लवकरात लवकर संपवावा, अशी विनती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असेही त्यांनी नमूद केले

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल, याबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यावर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, कुठल्याही राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आरक्षण कसं मिळेल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करणे महत्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT