Dhanjay Mahadik, krushna Mahadik, Rajesh Kshirsagar, satyajeet kadam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhanajay Mahadik News : पुत्रासाठी महाडिकांनी डाव टाकला, पण महायुतीत फाटले !

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुत्रासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रणकंदन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुत्रासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुत्र प्रेमासाठी केलेली धडपड आता महायुतीमध्ये वादाला कारण ठरत आहे. राजेश क्षीरसागर यांनी देखील मेळावा घेत आपण सोमवारी 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरत असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांच्या खेळीने मात्र महायुतीमधील क्षीरसागर आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम हे नाराज झाले आहेत. या दोघांनीही स्वतंत्र मेळावा घेत थेट महायुतीच्या नेत्यांनाच आव्हान दिले आहे.

कोल्हापूर उत्तरवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना उमेदवारी निश्चित होत असताना धनंजय महाडिक यांनी पुत्र कृष्णा महाडिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. गुण्या गोविंदाने एकमेकांच्या हातात हात घातलेल्या महायुतीत मात्र या प्रकारामुळे मिठाचा खडा पडला आहे.

क्षीरसागर यांनी रात्रीच मेळावा घेतला. कोल्हापूर उत्तरच्या जागेत हस्तक्षेप झाल्यास दक्षिणमध्ये शिवसेनेची भूमिका दाखवून देऊ, असा सूर कार्यकर्त्यांचा उमटला. शिवाय माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची उमेदवारी मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले, पण स्वतःच्या मुलांबाबत उमेदवारीचा शब्द टाकला, असा आरोप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आला.

दुसरीकडे पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम हे देखील बंडाच्या तयारीत आहेत. महाडिक यांच्या भूमिकेमुळे कदम देखील नाराज झाले आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात ती कोणती भूमिका घेतील, हे पाहणे महत्वाचे आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत, जागा वाटपात हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे. लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सत्यजित कदम यांच्या उमेदवारीसाठी गेलो होतो. मात्र, त्यांच्याकडूनच मला कृष्णराज यांच्याबाबत विचारणा झाली.

कृष्णाला उमेदवारी मिळाल्यास मलाही आनंदच होईल. पण कदम यांचे देखील कष्ट गेल्या पाच ते दहा वर्षापासून आहेत. महायुतीमध्ये कोणालाही उमेदवारी मिळाली तर महाडिक गट आणि कुटुंब त्या उमेदवाराचा प्रचार करेल, असे आश्वासित महाडिक यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT