कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक काँग्रेसकडून (Congress) आणि भाजप (BJP) प्रतिष्ठेची केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी खासदार धनंजय महाडिक, राहुल चिकोडे आणि महेश जाधव यांच्यावर टाकली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक संचालन समिती नियुक्त करण्याचे अधिकार या तीन नेत्यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सत्यजित कदम हे महाडिकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री सजेत पाटील विरुद्ध महाडिक गट असे चित्र या निवडणुकीत दिसणार आहे.
या पोटनिवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीतील सगळ्याच घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केल्याने बंटी पाटलांनी अर्धी लढाई जिंकली आहे.
कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याची इच्छा स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पण शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. यामुळे जयश्री जाधव या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. त्यांच्या उमेदवारीची काँग्रेसकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. उत्तर मतदारसंघातून शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रमुख यांच्या कानावर स्थानिक शिवसैनिकांच्या भावना घालू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधूनशिवसेना लढण्याची चर्चा सुरु झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.