Satej Patil, Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : 'सतेज पाटलांना नैराश्य म्हणूनच महायुतीवर...'. धनंजय महाडिकांचा घणाघात

Dhananjay Mahadik Satej Patil : धनंजय महाडिक म्हणाले, सतेज पाटलांनी काय आरोप केले याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचे आरोप नैराश्यातून होत आहेत.

Rahul Gadkar

Gokul Election: मुख्यमंत्र्यांचा कोणताही हस्तक्षेप गोकुळ निवडणुकीत नाही. गेल्या निवडणुकी वेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना पॅनलची घोषणा मुंबईतून झाली होती तेव्हापासून हा पायंडा पडला आहे. चार पक्ष महायुतीत असल्यानं मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे ही बैठक होत आहे. सतेज पाटलांनी काय आरोप केले याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचे आरोप नैराश्यातून होत आहेत. 90% ठराव महायुतीकडे असल्यानं या निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. ते कोल्हापूरात बोलत होते.

गोकुळच्या निवडणुकीसाठी आज महायुतीची मुंबईत बैठक होत आहे. यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, मुश्रीफ प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत आज पॅनेलची घोषणा होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत, पण 7 ऑक्टोबर 2001 ला त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 26 मे 2014 रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली होती, यानिमित्ताने भाजपकडून सेवा ज्योती यात्रेचे आयोजन केले असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

देशातील 25 कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेबाहेर आणण्यासाठी प्रधानमंत्री मोदींनी प्रयत्न केले. बारा कोटी घरात गॅस तर चार कोटी लाभार्थ्यांना आवास योजनेचा वाटप केले.

देशभरातील 80 करोड जनतेला मोफत रेशन देण्याचं काम प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात झालं.असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधींचं वर्तन नैराश्यातून आहे. गांधींचा व्होटचोरीचा आरोप आजचा नाही. सुरुवातीला त्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला, त्यांचा मुद्दा खोडून काढण्याचं काम जनतेने केलं. काँग्रेस आणि राहुल गांधींनी एसआयआर विरोधात काल खासदारांचा मोर्चा काढला. मात्र ही प्रक्रिया देशात पहिल्यांदा होत नाही. यापूर्वी दहा वेळा करण्यात आलीय. देशात काँग्रेसचे सरकार असताना एसआयआर प्रक्रिया झाली होती. ती आताही सुरू आहे. काँग्रेसचं सरकार आलं की ईव्हीएम आणि एसआयआर चांगलं मात्र भाजपचं सरकार आलं की निवडणूक खोटी काँग्रेसने दिल्लीत केलेलं आंदोलन फेकनेरिटीव्ह सेट करण्यासाठी केलं त्यामुळे देशातील नागरीक काँग्रेसला भिक घालणार नाहीत. असा टोला खासदार महाडिक यांनी हानला.

विद्यार्थ्यांच्या 12 मागण्या मान्य

एमपीएससी विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. पेपर फुटीच जाहीर प्रकटन झालं, यात अटक सुद्धा झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या 12 मागण्या सरकारनं पूर्ण केल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे. त्या समितीने अहवाल दिल्यानंतर जे दोषी असतील ते निलंबित होतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज्य सरकारचे सहकार्य असल्याच खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT