Uddhav Thackeray, Dhanjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik News : उद्धवजी मला तुमचा अवमान करायचा नाही; पण महाडीकांचा भांग ही कोणी विस्कटू शकत नाही

Political News : महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच खासदार धनंजय महाडिक यांनी टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवस शिल्लक राहिले असताना कोल्हापूर जिल्ह्यात आता दोन्ही आघाड्यांमधील प्रचाराची लगबग वाढली आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच खासदार धनंजय महाडिक यांनी टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्याकडून लाडकी बहीण संदर्भात वक्तव्य झाले. त्याचा चुकीच्या पद्धतीने पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र, मी लगेच माफी मागितली. मात्र, सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील महिलांचा अपमान केला. त्यांनी माफी मागितली नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्येक भाषणात जाऊन सांगत आहेत.

मुन्ना महाडिकाचे हात मोडा, लाथ घाला. मात्र उद्धव ठाकरे मी तुमची माफी मागतो. तुमचा अपमान करायचं नाही. मात्र, या मुन्ना महाडीकांचा कोणी भांग पण विस्कटू शकेल, असा माणूस अजून या पृथ्वीवर जन्माला आला नाही. अशा शब्दात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik ) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मला हे बोलायचं नव्हते. मात्र, माझ्या बोलण्याचा गैर अर्थ काढून कोणी भांडवल करू नये. यासाठी मी हे बोलत आहे. असे सांगत धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आम्ही 1500 रुपये दिले तेव्हा तिजोरी रिकामी होईल म्हणून आम्हाला विरोध केला. मात्र, आता स्वतःच्या जाहीरनाम्यात 3000 देणार म्हणतात. तिजोरी रिकामी आहे म्हणता, मग तुम्ही कोठून देणार? काँग्रेस दिशाभूल करण्याचं काम करत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. कोल्हापुरात काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही, असे महाडिक म्हणाले.

एका भाषणाप्रसंगी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, मी सतेज पाटील यांच्यासारखं वागलो तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे सतेज पाटील खुनशी आहेत. हे त्यांच्याच पक्षातील लोक सांगत आहेत. ते पालकमंत्री असताना ही शहराचा काही विकास केला नाही. टोलला त्यांनी पाठिंबा दिला सतेज पाटील म्हणजे सूर्याजी पिसाळ आहेत, अशी टीका महाडिक यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT