Dhananjay Mahadik on Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : 'एकटा पडलो म्हणून कधी टीव्ही फोडले नाही, गाव सोडलं नाही', मुन्नांनी बंटी पाटलांना डिवचले

Dhananjay Mahadik On Satej Patil : कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात सध्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या वक्तव्याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी, 'मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलोय', असे वक्तव्य केलं होतं.

Rahul Gadkar

Kolhapur News : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या 'मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलोय', या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलेलं आहे. या वक्तव्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील टोला लगावताना सतेज पाटील यांना सल्ला दिला होता. तर आता याच विधानावरून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार डिवचले पाटील यांना डिवचले आहे. त्यांनी, राजकारणामध्ये अनेक चढ-उतार येत असतात. मी देखील ते पाहिले आहेत. मात्र कधी नाराज व्हायचं नसतं. आम्ही कधीही म्हटलं नाही, की आम्ही एकटे पडलो आहोत. ते कोल्हापुरात भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

2019 लोकसभेला माझा घात झाला होता. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असताना माझा पराभव केला. विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता. गोकुळ मधील आमची सत्ता गेली होती. विधान परिषद गेली. मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही. लोकांची कामे करत राहिलो. पुन्हा खासदार झालो. पण आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही. किंवा गाव सोडून गेलो नाही. अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेत डिवचले आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहेत. सध्या शिवसेनेमध्ये काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी येत आहेत. भविष्यात भाजपमध्ये देखील अनेक नेते येतील. कोल्हापूर शहरात भाजपमध्येच इतके पदाधिकारी आहेत, की नवीन येणाऱ्या नेत्यामुळे आपला कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, हे पहावे लागत असल्याचेही खासदार महाडिक म्हणाले.

गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच

विरोधकांचे संचालक आजही गोकुळमध्ये आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच कामाला लागले आहेत. गोकुळची निवडणूक वर्षभरात होणार आहे. विरोधकांनी प्रचार करायचा नाही का? असे देखील महाडिक यांनी सांगितले.

देशातील 140 कोटी जनतेला सोबत घेऊन 11 वर्षात देशाची प्रगती केली. भाजप सरकारने गरिबांची सेवा केली, सरकार म्हणजे सेवा होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जनतेला आपण जबाबदार असतो हे दाखवून दिले. युपीएच्या काळात अनेक घोटाळ्याची मालिका पाहायला मिळाली होती. मात्र 2014 नंतर विकासाचे राजकारण देशातील नागरिकांना पाहायला मिळाल्याचेही महाडिक म्हणाले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजप सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.

गोकुळ अन् विधानपरिषदही घेणार

दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर बोलताना, खासदार धनंजय महाडिक यांनी आगामी राजकारणातील स्पष्ट संकेत दिले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ घेणार असा त्यांनी निर्धार बोलून दाखवला आहे. तसेच त्यांनी विधानपरिषद देखील महायुतीसोबत भाजपकडे घेणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT