Chandrakant Patil Dhananjay Mahadik : भाजपमधील संघर्षाचा वणवा स्थानिकला पेटणार? वर्चस्व ठेवण्यासाठी मंत्री पाटील-महाडिकांच्यात ईर्षा

Chandrakant Patil Dhananjay Mahadik conflict : नुकतीच भाजपच्या संघटनात्मक निवडी झाल्या. यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांची फेरनियुक्ती झाली. या नावांना कोणाचाच विरोध नव्हता.
Chandrakant Patil Dhananjay Mahadik conflict
Chandrakant Patil Dhananjay Mahadik sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमधील जुन्या-नव्या कार्यकर्त्यावरून अंतर्गत वाद अद्याप न मिटल्याचे चित्र आहे. भाजप जिल्ह्याध्यक्ष निवडीवरून तो आणखी गडद झाला आहे. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील सुप्त संघर्ष यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर यामागे आहे. या निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असावे यावरून सुरु असलेली ईर्षा आता भाजपच्या वर्तुळात चांगलीच रंगलीय.

नुकत्याच पार पडलेल्या विधासभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा जिल्ह्यातील दहा मतदार संघात फडकला. तर कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी आणि चंदगड विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यात आता भाजपची ताकद वाढली आहे. नुकतीच भाजपच्या संघटनात्मक निवडी झाल्या. यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांची फेरनियुक्ती झाली. या नावांना कोणाचाच विरोध नव्हता.

तर दुसरीकडे कोल्हापूर महानगर अध्यक्षावरून भाजपमधील ईर्षा चांगलीच पेटली होती. या पदासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर आणि विद्यमान अध्यक्ष जाधव हे दोघेही इच्छुक होते. पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी ठाणेकर यांचे नाव सुचवले होते. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाधव यांच्या नावाचा आग्रह धरला होता. खासदार महाडिक यांनी माजी नगरसेवक अजित तर, मंत्री पाटील विजय जाधव यांच्या नावावर ठाम होते.

Chandrakant Patil Dhananjay Mahadik conflict
Chandrakant Patil : 'काळजी करू नका! महायुतीबाबत योग्यच निर्णय'; चंद्रकांतदादांचा स्वबळाबाबत सूचक इशारा

दोन दिवसापूर्वी रखडलेली जिल्ह्याध्यक्ष पदाची यादी जाहीर झाली. त्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. मात्र यावरून भाजपमधील संघर्ष आणखी गडद झाला आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हा अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. कारण वस्तुस्थिती माहित गेलेल्या काही दिवसापासून महाडिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची सगळी सूत्रे पक्षाने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडेच उमेदवार निश्‍चित करणे, निवडणुकीची रणनीती आखणे याची जबाबदारी दिली आहे. मंत्री पाटील यांच्याकडून कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर जोडण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे.

Chandrakant Patil Dhananjay Mahadik conflict
Chandrakant Patil : 'मी देखील चळवळीतून पुढं आलोय, आवाज वाढवायचा नाय'; चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

महाडिक गटाच्या राजकारणात सक्रिय असणारे सुहार लटोरे हे सध्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना स्थानिक राजकारणात साहाय्य करत असल्याचे दिसतात. तर माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील हे खासदार धनंजय महाडिक यांच्या साहाय्यकाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर वर्चस्व राखण्यासाठी आपल्या मर्जीतील अध्यक्ष असावा यासाठी दोन नेत्यांमधील ईर्षा दिसून आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com