Rajesh Kshirsagar dhananjay Mahadik And satej Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : महायुतीचे मिशन 'टार्गेट बंटी पाटील'; धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर तुटून पडले, मुश्रीफांनी अंग काढले?

Mahayuti Target Satej Patil : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या टार्गेटवर सतेज पाटील आहेत. विरोधक पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात येत असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. विकासकामे आणि कोल्हापूरकारांसाठी काय करणार याचा प्रचार करत असताना महायुतीच्या टार्गेट बंटी उर्फ सतेज पाटील असल्याचे प्रचारसभांमधून पाहण्यास मिळत आहे.

महायुतील भाजप, शिवसेनेतील नेत्यांसह आणि आम आदमी पक्षाचे नेते देखील सतेज पाटलांवर तुटून पडलेत. मात्र या प्रचारात मंत्री मुश्रीफ यांची सावध भूमिका घेतल्याचे दिसते आहे.

महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत असताना काँग्रेसने ठाकरेंच्या सेनेला केवळ सहा जागा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पक्षाला यांना सन्मानजनक जागा मिळत नसल्याने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र त्यांच्या प्रचारात देखील महायुतीपेक्षा सतेज पाटीलच टार्गेट दिसत आहेत.

आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांनी सतेज पाटलांवर हल्लाबोल करत म्हटले की, आता घरात बसा,काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे फसवणूकनामा आहे.

शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून थेट पाईपलाईनच्या मुद्द्यांवरून पाटलांना टार्गेट केले जात आहे. शिवाय आमदार पाटील यांची प्रतिमा फेक, निगेटिव्ह पसरवणारी आहे, असे म्हटले.

खासदार धनंजय महाडिक यांनी देखील पाटील यांच्यावरच आपला टीकेचा बाण सोडले आहेत. ज्या ठिकाणी महायुती म्हणून सभा झाली आहे. अशा ठिकाणी सतेज पाटील यांच्या व्यक्तिमत्वावरच प्रहार केला जात आहे. या टीकेची सुरुवात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून सुरू झाली.

मुश्रीफांनी वैयक्तिक टीका टाळली

महायुतीतील घटक पक्ष असलेले आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. केवळ महायुतीच्या सभेला उपस्थिती लावणे, महायुतीने शहरात केलेली विविध विकास कामांवर बोलत वैयक्तिक टीका मंत्री मुश्रीफ यांनी टाळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT