

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजप महायुती एकत्रितपणे जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जाणार आहेत.
महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.
Ratnagiri Political News : राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा राज्यात धुरळा उडत असून मतदान १५ जानेवारीला होणार आहे. तसेच दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार असून कोण सिंकदर ठरणार याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तर आपणच पालिका आणि नगरपंचायती निवडणुकांप्रमाणेच महानगरपालिकेतही सरस ठरू असा विश्वास महायुतीकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान एकीकडे सर्वच पक्षांकडून राज्यभर महानगरपालिकेसाठी मोर्चे बांधणी केली जात असतानाच ज्या जिल्ह्यात महानगरपालिका नाहीत. तेथे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. प्रशासनही आपली तयारी करताना दिसत आहे. अशीच जय्यत तयारी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होताना दिसत असून जिल्हा निवडणूक विभागाने आपली कंबर कसली असून राजकीय पक्षांनी देखील युती आणि आघाड्यांसाठी दंड थोपाटले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायती निवडणुका झाल्यानंतर लगेचच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा राज्यात धुरळा उडत आहे.
१५ जानेवारीला यासाठी मतदान होणार असून, १६ला लगेच निकाल आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक राज्य निवडणूक आयोग कधीही जाहीर करू शकते, अशी परिस्थिती आहे. यामुळे महानगरपालिकांच्या निकालापूर्वी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार की, निकाल झाल्यानंतर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता पाहता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-भाजप हे महायुती म्हणून जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जाणार, हे निश्चित आहे. पण महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका काय राहणार, हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. तसेच महायुतीने आताही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याचे सध्यातरी दिसत असून राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने आपली तयारी केली असून, २०२५-२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुधारित मतदार संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार असून, यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ६५ हजार ७७९ एवढे आहेत तर एकूण महिला मतदार ६ लाख ८ हजार ११० असून, इतर १० मतदारांचा समावेश आहे.
मतदारसंख्येच्या बाबतीत रत्नागिरी तालुका हा सर्वांत जास्त २ लाख ४ हजार ४९३ मतदार आहेत. तर सर्वांत कमी मतदान असलेला मंडणगड तालुका असून, तेथे ५५ हजार १११ मतदारांची नोंद आहे. सर्वच तालुक्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. जे मतदान निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू शकते.
1. जिल्हा परिषद निवडणुका कधी होण्याची शक्यता आहे?
→ कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2. शिवसेना-भाजप कोणत्या आघाडीखाली निवडणूक लढवणार?
→ दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
3. महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?
→ सध्या महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झालेली नाही.
4. अजित पवार गट स्वतंत्र लढणार का?
→ अजित पवार गटाची रणनीती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
5. पालिका निवडणुकांचा या निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
→ पालिका व नगरपंचायतीतील यशाचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.