Solapur, 03 January : संतोष देशमुख खून प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे. कुणी राजीनामा मागितला; म्हणून दिलाच पाहिजे असं नसतं. एसआयटीचा अहवाल आल्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय होईल, असे सांगून विखे पाटील यांनी देशमुख खून प्रकरणात मुंडेंची जोरदारपणे पाठराखण केली आहे.
उजनी कालवा सल्लागर समितीची बैठक सोलापुरात झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलले आहेत. ते म्हणाले की, बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत तीनही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे. त्याच्यावर मी भाष्य करू शकणार नाही.
विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यावर विखे पाटील यांनी मुंडे यांची खंबीरपणे पाठराखण केली आहे. ते म्हणाले, कुणी राजीनामा मागितला; म्हणून दिलाच पाहिजे असं नसतं. संतोष देशमुख खूनप्रकरणी सरकारकडून एसआयटी नेमली आहे, आयजी रँकचा तो अधिकारी आहे. एसआयटीचा अहवाल आल्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना समता परिषदेच्या नावाने राजकीय पक्ष काढण्याची विनंती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. त्यावर विखे पाटील म्हणाले, महादेव जानकर यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करायची आहे, त्यामुळे कोण काय भूमिका मांडता, त्याबद्दल भाष्य केलंखच पाहिजे, हे गरजेचे नाही.
वाल्मीक कराडबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. संतोष देशमुख खून प्रकरणी एसआयटी नेमली आहे. कराड असेल अजून कोणी असेल त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायचा प्रश्न नाही, असेही जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रणिती शिंदे या खासदार आहेत, विरोधी पक्षावर टीका करता करता काँग्रेस पक्षाची अवस्था काय झाली आहे हे, मी सांगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.
विधानसभेला विरोधकांची पीछेहाट झाली आणि लोकसभेला त्यांनी फेक नेरिटीव्ह सेट करून यश मिळवले होते. विधानसभेलाही यश मिळेल... अशा धुंदीत ते वावरत होते. आता ते जमिनीवर आलेले आहेत आणि लोकांनी त्यांना धोबीपछाड दिलेली आहे, त्यामुळे विरोधक कारण शोधत आहेत.. स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी ते धडपडत आहेत, विरोधकांच्या आरोपात अजिबात तथ्य वाटत नाही, असेही विखे पाटील यांनी नमूद केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.