Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्येवरुन वातावरण तापलेलं असतानाच धनंजय मुंडे अन् सीएम फडणवीसांमध्ये बैठक, काय आहे कारण?

Santosh Deshmukh Murder Case : सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये महामोर्चा काढल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले असून महायुती सरकारवर प्रचंड दबाव आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे.अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली
Dhananjay Munde 2
Dhananjay Munde 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये महामोर्चा काढल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले असून महायुती सरकारवर प्रचंड दबाव आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे.अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असल्याचे बोले जात आहेत. 

९ डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, तीन आरोपी फरार आहेत. वाल्मिकी कराड हा देशमुख खून प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे.  वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान सरपंच हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.अशातच आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पाच खात्यांच्या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्र्यांना निमंत्रण नसताना देखील मंत्री धनंजय मुंडे बैठकीला दाखल झाल्याने उलटसुलटं चर्चांना उधाण आलं आहे.

Dhananjay Munde 2
Suresh Dhas : "जे काही झालं त्याला मी समोरे जायला तयार", प्राजक्ता माळीच्या तक्रारीवर धस यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यानी विविध पाच खात्यांच्या आगामी १०० दिवसांच्या रोड मॅपचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. हि बैठक सचिवांन पुरतीच मर्यादित होती.  या बैठकीत संबंधित खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार नव्हते.

Dhananjay Munde 2
Chetan Tupe : मोठी राजकीय घडामोड! अजितदादांच्या आमदारानं घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, ..तर दोन्ही पवार एकत्र येतील!

तरी देखील धनंजय मुंडे हेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एंट्रीनंतर काही वेळातच सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये बीड बाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणे औतुक्याचे ठरणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com