Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळांना महादेव जानकरांनी दिला हा मोलाचा सल्ला; भुजबळ ऐकणार का?

Mahadev Jankar advice To Chhagan Bhujbal : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पक्ष काढण्याचा निर्णय घेतला ते छान होईल. आताच नाही पुढच्या पिढ्यांचे तरी नक्की चांगलं होईल.
Mahadev Jankar-Chhagan Bhujbal
Mahadev Jankar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 03 January : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. ओबीसींना डावलले जात असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. परदेशातून भारतात परतलेले नाराज छगन भुजबळ हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. नाराज भुजबळांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एक सल्ला दिला आहे, तो सल्ला छगन भुजबळ मानणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिक गाठले होते. नाशिकमध्ये त्यांनी ओबीसींचा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यातून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडले होते. निर्णय प्रक्रियेत आपल्या सामावून घेतले जात नाही. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार नाही, हे त्यांनी अगोदर सांगायला हवे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याऐवजी भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, भुजबळ आणि फडणवीस या दोघांनीही ती शक्यता फेटाळून लावली हेाती. मात्र, त्यानंतर भुजबळ हे परदेशात निघून गेले होते. आता ते परदेशातून परतले असून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

Mahadev Jankar-Chhagan Bhujbal
Solapur Congress : काँग्रेसची पडझड थांबेना...जिल्हाध्यक्षांपाठोपाठ माजी शहराध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी!

क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त ते आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. त्यामुळे त्यांची पवारांशी पुन्हा सलगी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच कार्यक्रमाला मंत्रिपद न मिळू शकलेले दिलीप वळसे पाटीलही येणार आहेत. त्यामुळे भुजबळ आणि पवार काय बोलणार याकडे पुण्याचे लक्ष राहणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही छगन भुजबळ यांना सांगितले होते की, तुम्ही एखादा समता परिषदेचा पक्ष काढावा. आम्ही तुमच्यासोबत युती करू. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पक्ष काढण्याचा निर्णय घेतला ते छान होईल. आताच नाही पुढच्या पिढ्यांचे तरी नक्की चांगलं होईल.

Mahadev Jankar-Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : नाराज भुजबळांचा परदेशवारीनंतरचा पहिला कार्यक्रम थोरल्या पवारांसोबत; राजकीय चर्चांना उधाण!

महादेव जानकर यांनी पक्ष काढण्याच्या सल्ल्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, महादेव जानकर यांनी पक्ष काढण्याची सूचना केलेली आहे. त्यावर काय करता येईल, ते पाहू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com