Gopichand Padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Gopichand Padalkar News : धनगर समाजाचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेशला जाणार : पडळकर

Dhangar Reservation धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी कराड तहसील कार्यालयासमोर जयप्रकाश हुलवान यांनी १४ दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले होते.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Gopichand Padalkar News : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकारात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी काही अद्यादेश काढले आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय अधिकारी व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ त्या राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत शिष्टमंडळात कोण असेल ते ठऱवले जाईल आणि ते शिष्टमंडळ त्या राज्यात रवाना होईल, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज येथे दिली.

धनगर समाजाला Dhangar Community एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर जयप्रकाश हुलवान यांनी १४ दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले होते. त्यांना सरबत देऊन ते आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पडळकर Gopichand Padalkar बोलत होते. तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील धनगर बांधवांची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, अशी तीव्र भावना आहे. साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज धनगर बांधवांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली. समाजाचे शिष्टमंडळ बैठकीस उपस्थित होते.

सरकारच्या वतीने जयप्रकाश हुलवान यांना राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचलत आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यांना जिल्हा प्रशासकीय अधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस उपधीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनी सहकार्य केले.

ते म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयात सरकारच्या वतीने तीन अॅफेडेव्हिट दाखल केली आहे. आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आजच तारीख होती. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आठ, ११ आणि १५ डिसेंबर ही धनगर समाजाच्या आऱक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणीच्या तारखा ठेवल्या आहेत. त्यानंतर त्याचा निकाल येईल. न्यायालय आमची बाजू घेईल अशी आम्हाला आशा आहे.

धनगर समाजाच्या बाजूने आरक्षण देण्यासाठीची कार्यवाही करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. ते म्हणाले, अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीत बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकारात काही अध्यादेश काढले आहेत. ते आम्ही राज्य सरकारकडे दिले आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय अधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ त्या राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत शिष्टमंडळात कोण असेल ते ठऱवले जाईल.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT