मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजपने ‘धाराशिव पॅटर्न’ वापरत राष्ट्रवादी नेते अजित जगताप यांच्या पत्नी प्रा. सुप्रिया जगताप यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, ज्यामुळे राजकीय चर्चेला जोर आला आहे.
नगराध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाही आमदार समाधान आवताडे आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या निर्णयावर प्रा. सुप्रिया जगताप यांची निवड झाली, कारण त्यांच्या नेतृत्वामुळे शहर विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.
भाजपने 17 जागांवर उमेदवार दिले असून राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागा मिळाल्या, तर शिवसेनेने स्थानिक आघाडी टिकवून ठेवत निवडणुकीत भूमिका घेतली आहे.
Mangalvedha, 17 November : सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ‘धाराशिव पॅटर्न’ राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अजित जगताप यांची पत्नी प्रा. सुप्रिया जगताप यांना भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. धाराशिवमध्येही राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार, तर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे मंगळवेढ्यात धाराशिव पॅटर्नची चर्चा रंगली आहे.
मंगळवेढ्याच्या (Mangalvedha) नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रा. सुप्रिया जगताप, राधा सुरवसे, प्रा. तेजस्विनी कदम व अन्य नावांची चर्चा होती, त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार, याविषयी तर्क वितर्क लढवले जात होते. काही उमेदवाराच्या समर्थकांनी पोलच्या माध्यमातून नगराध्यक्ष कोण असावा, याबाबत शहरवासीयांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये प्रा. तेजस्विनी कदम आणि प्रा. सुप्रिया जगताप यांच्यात गेली दोन दिवस चढाओढ होती.
अखेर आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी नगरपालिकवर भाजपचे (BJP) कमळ फडकविण्याच्या दृष्टिकोनातून प्रा. सुप्रिया जगताप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित जगताप यांनी यापूर्वी नगरसेवक आणि जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे.
सरकारच्या अनेक योजना राबवून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला होता. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या तर आणखी निधी मिळून शहराच्या विकासाला गती येईल, या दृष्टिकोनातून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित जगताप यांनी समविचारी आघाडी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी समविचारीला सोडचिठ्ठी देत आमदार समाधान आवताडे यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. प्रा. सुप्रिया जगताप यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यातूनच त्यांना आमदार समाधान आवताडे यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे.
मंगळवेढ्यात एक नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या 17 जागी भाजपचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा देण्यात आल्या आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्थानिक आघाडीत राहण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे सुशांत हजारे, सुदर्शन यादव यांच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण जागा वाटपाच्या तडजोडीत या दोघांना उमेदवारी मिळू शकली नाही.
– राष्ट्रवादी नेत्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन व्यापक मतसंघात समन्वय साधण्यासाठी.
– त्यांच्या पती अजित जगताप यांच्या अनुभव आणि विकासकामामुळे शहराला अधिक निधी मिळू शकतो, म्हणून.
– भाजप एकूण 17 नगरसेवक जागांवर उमेदवार देत आहे.
– महायुतीत राहून स्थानिक आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.