Ram Satpute
Ram Satpute  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत ढोबळेचा शाहू परिवार राम सातपुतेंच्या पाठिशी!

हुकूम मुलाणी

Solapur Lok Sabha Constituency : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. शिवाय, मतदारांकडूनही उमेदवारांना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपा व महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ शाहू परिवाराचा मेळावा वाघोलीत पार पडला.

यामध्ये 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली. त्यांच्या नेतृत्वातच भारत वेगाने प्रगती करत आहे. शाहू परिवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा राहण्याची घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.' असे प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपा व महायुतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ शाहू परिवाराचा मेळावा वाघोली येथील महात्मा फुले सूतगिरणी येथे झाला, यामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड, रवी वाघमोडे, संतोष दामोदरे, गणेश भोसले, रामचंद्र पतंगे आदी उपस्थित होते.

आमदार सातपुते म्हणाले, की गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात विकास निधी आला तरीही विरोधकांकडून दहा वर्षांत काय केले? असा सूर लावला जात आहे. जिल्ह्यात महामार्ग, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना, स्मार्ट सिटी असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आता राहिलेले विकास कामे मार्गी लावण्यासाठी शाहू परिवाराने आपल्या पाठिशी उभा राहण्याची भूमिका घेतली हे मी कधीही विसरू शकत नाही.

अभिजीत ढोबळे म्हणाले, आमदार सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात कोट्यावधीचा निधी आणून विकास केला. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर केले. त्यांना दिल्लीला पाठविल्यास जिल्ह्यातील विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे महात्मा फुले सुत गिरणीच्या सर्व सभासदांनी तसेच शाहू परिवाराच्या सर्व सदस्यांनी आमदार सातपुते यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे. प्रास्ताविक शाहू परिवाराचे राजेंद्र पोतदार यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT