Karmala, 28 October : करमाळा विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला असून बागल गटाचे युवा नेते मकाई सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल हे आज रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सध्या भाजपबरोबर असलेले बागल हे महायुतीतील जागेच्या ॲडजेस्टमेंटसाठी शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर करमाळ्यातून लढणार आहेत.
करमाळा मतदारसंघात (Karmala Constituency) महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र, त्यांनी महायुतीऐवजी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती शिंदेंना पाठिंबा देणार की उमेदवार उतरविणार? या विषयी तर्कवितर्क लावले जात होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनीही करमाळ्याची जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह धरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता, तर भाजपचे गणेश चिवटे हे उमेदवारीसाठी आग्रही होते.
महायुती करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांना पुरस्कृत करणार की उमेदवारी देणार याविषयी उत्सुकता वाढली होती. मात्र, दिग्विजय बागल (Digvijay Bagal) हे आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार असून उद्या मंगळवारी (ता. 29 ऑक्टोबर) शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दिग्विजय बागल यांनी सोमवारी (ता. 28 ऑक्टोबर) सकाळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी एकच मामा डिगा मामा अशा घोषणा देत दिग्विजय बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी माजी आमदार श्यामल बागल, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.