Karmala Politics : भाजप वाढविणार संजय शिंदेंचे टेन्शन; करमाळ्यात तिरंगी लढतीत दिग्विजय बागल देणार शिंदे-पाटलांना चॅलेंज!

Maharashtra Assembly Election 2024 : करमाळा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप लढवणार असल्याची माहिती आहे.
Sanjay Shinde-Narayan Patil- Digvijay Bagal
Sanjay Shinde-Narayan Patil- Digvijay Bagal Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 October : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याची लगीनघाई प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यालयात सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे. करमाळा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप लढवणार असल्याची माहिती आहे.

भाजपकडून माजी मंत्री दिगंबर बागल यांचे चिरंजीव दिग्विजय बागल हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या वेळी करमाळ्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघासाठी (Karmala Constituency) महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार संजय शिंदे ही लढत निश्चित मानली जात असतानाच आता महायुतीकडून भाजपही करमाळ्याच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे करमाळा मतदासंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोहोळ, माढा आणि करमाळा मतदारसंघ येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोण लढवणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sanjay Shinde-Narayan Patil- Digvijay Bagal
Solapur Politic's : सोलापुरातील दोन शरदनिष्ठांचा अजितदादांवर हल्लाबोल; एकाने पक्ष सोडला, दुसऱ्याची पवारांकडे उमेदवारीची मागणी

आमदार संजय शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांचे बंधू आमदार बबनराव शिंदे यांच्याप्रमाणे संजय शिंदे यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीतही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले होते, त्यामुळे त्यांनी यंदाही घड्याळाच्या चिन्हाऐवजी अपक्ष निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिले आहे.

संजय शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीमध्ये ही जागा कोण लढवणार, याची उत्सुकता आहे. करमाळ्यात भाजपकडून बागल कुटुंबीयातील सदस्य निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील दोन निवडणुका रश्मी बागल यांनी लढवल्या असून त्यांना या दोन्ही निवडणुकीत अपयश आले आहे.

Sanjay Shinde-Narayan Patil- Digvijay Bagal
Sangola Politic's : साळुंखेंच्या हाती मशाल; गणपतआबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुखही घेणार मोठा निर्णय...

रश्मी बागल यांना मागील दोन निवडणुकीत आलेले अपयश लक्षात घेऊन येत्या निवडणुकीत दिग्विजय बागल हे भाजपकडून निवडणूक लढवतील, असे चर्चा करमाळ्याच्या राजकीय वर्तुळात आहे. मागील दोन निवडणुकीत रश्मी बागल यांना अपयश आल्याने बागल गट या वेळी दिग्विजय यांचे नाव पुढे करत आहे. मात्र, भाजप दिग्विजय बागल यांना उमेदवारीसाठी प्राधान्य देणार का, हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com