Dilip Sopal News
Dilip Sopal News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dilip Sopal : "बॅनरबाजी करू नका, बंगल्यावर या"...

Anand Surwase

Solapur News : यंदा सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळा जाहीर आहे. त्याच पार्श्वभूमीवर बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे. सोपल यांचा 16 डिसेंबरला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने प्रतिवर्षी सोपलांचे समर्थक मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र यंदा तालुक्यात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. त्यामुळे यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यकर्त्यांने शुभेच्छांचे बॅनर लावू नये, असे आवाहन सोपल यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राजकारणात आपल्या खुमासदार भाषणाने खळखळून हसायला लावणारे आणि खोचक टोलेबाजीने विरोधकांचा समाचार घेणारे सोपल राज्याला परिचित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनातून त्यांच्या सहृदयी स्वभावाचाही एक पैलू समोर आला आहे. सोपल यांनी समर्थक कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सद्यस्थितीत बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे.तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पीक वाया गेले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी अनेक मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले आहे. अशा पार्श्वभूमीवर मोठ्या धामधुमीत माझा वाढदिवस साजरा करणे उचित होणार नसल्याची भावना सोपल यांनी व्यक्त केली आहे.

शुभेच्छांचे बॅनर नको, निवासस्थानी या

सोपल म्हणाले, आज पर्यंतच्या माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या प्रवासात बार्शीकरांसह सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत होत्याच. मात्र यावर्षी कोणीही माझ्या वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करू नये, तसेच कोणत्याही समारंभाचे आयोजन करू नये, याशिवाय माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनरबाजी यासाठी खर्च करू नये. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत राहतील.तसेच शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी बार्शीतील निवासस्थानी उपलब्ध असेन, मात्र कार्यकर्त्यांनी हार-तुरे, भेटवस्तू आणू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान,  2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून  पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सोपल फारसे सक्रीय नसल्याचे दिसून आले.सध्या मतदारसंघातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावताना दिसून येत आहेत. मात्र, शिवसेनेतून निवडणूक लढवलेल्या सोपलांनी पक्षात फूट पडल्यानंतर तटस्थ भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सोपल यांना शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून पक्ष-संघटनेची जबाबदारी देण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा काय असेल याचा अंदाज अद्याप तरी त्यांनी कोणाला लागू दिला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सोपल काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT