Umesh patil-Dilip Walse Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Manifesto Committee : लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर; वळसे पाटलांकडे अध्यक्षपदाची धुरा

Loksabha Election 2024 : जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली आहे. अठरा जणांच्या या समितीत मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचाही समावेश आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 24 march : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली. त्या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली आहे. अठरा जणांच्या या समितीत मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी यासंबंधीच पत्र प्रसिद्धीस दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या जाहीरनामा समितीच्या (Manifesto Committee) जबाबदारी मंत्री वळसे पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात कोणकोणत्या आश्वासने दिली जातात, याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या जाहीरनामा समितीमध्ये मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे. याशिवाय आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, ओबीसी सेलचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुद्धे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राज्य प्रवक्ते आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्किन हेही जाहीरनामा समितीत आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे हे या जाहीरनामा समितीचे निमंत्रक आहेत.

दरम्यान, उमेश पाटील यांच्यावर यापूर्वी महायुतीच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या महामेळाव्याचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी दिली होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी उमेश पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या जाहीरनामा समितीमध्येही त्यांना स्थान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT