Sangola Politics : आणखी एका पुतण्याचं काकांविरोधात बंड; शहाजीबापूंचा पुतण्या जाणार शरद पवारांसोबत...

Sangramshinh Patil Meet Sharad Pawar : शहाजीबापू पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात गेले आहेत. आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, आमदार पाटील यांनी बंडात एकनाथ शिंदे यांनी समर्थपणे साथ दिली आहे. ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मात्र, त्यांच्या घरातच आता फूट पडली आहे.
Sangramshinh Patil-Shahajibapu Patil
Sangramshinh Patil-Shahajibapu PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 March : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक पुतण्या काकाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. आता हा धक्का दुसरा तिसरा कुठला नसून सोलापूर जिह्यातील आहे. होय, ‘काय डोंगार...काय झाडी....काय हाटील’फेम सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना आता घरातून आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, त्यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे, ते पवारांच्या गोटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला पवार काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाची परंपराच चालत आलेली आहे. त्यामुळे सांगोल्याच्या पाटील काका-पुतण्याची त्यात नव्याने भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राजकीय इनकमिंग आणि आऊटगोईंही जोरात सुरू आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे, हेच सध्या कळत नसल्याची सर्वसामान्यांची बोलकी प्रतिक्रिया आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangramshinh Patil-Shahajibapu Patil
Solapur BJP : लोकसभेसाठी उमेदवार तयार करण्याचा दूरदृष्टीपणा सोलापूर भाजपने का गमावला?

शरद पवार (Sharad Pawar) आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील (Sangramshinh Patil) हे पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात गेले आहेत. आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, आमदार पाटील यांनी बंडात एकनाथ शिंदे यांनी समर्थपणे साथ दिली आहे. ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मात्र, त्यांच्या घरातच आता फूट पडली आहे.

शहाजीबापूंचे सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतली आहे. त्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर शहाजी पाटील यांच्यासाठी धक्का मानला जाईल. कारण, शहाजी पाटील यांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरात पडलेली फूट शहाजी पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

Sangramshinh Patil-Shahajibapu Patil
Nanded Politics : अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये बस्तान बसविले; आता मेहुणे खतगावकरांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com