Mahavikas Aghadi News : पक्ष अन्‌ नेत्यांवरील राग उमेदवारावर काढू नका; महाआघाडीच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Loksabha Election 2024 : नेत्यांनी कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संवाद देखील साधला. कार्यकर्ते अथवा नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर असलेला वाद निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम करू शकतो. या भीतीने महाविकास आघाडीचे नेते ग्रस्त आहेत.
Mahavikas Aghadi Leader
Mahavikas Aghadi LeaderSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon, 24 March : यंदाची लोकसभा निवडणूक फक्त देशासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडी ही निवडणूक हमखास जिंकेल, असा विश्वास नेतेमंडळींकडून व्यक्त होत आहे. मात्र, पक्ष आणि नेत्यांविषयी राग असल्यास आताच बोला, त्यावर तोडगा काढू. पण त्याचा उमेदवारावर राग काढू नका, अशा शब्दांत महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी समजूत नेत्यांकडून काढली जात आहे.

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahavikas Aghadi Leader
Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेनेचा गिरीश महाजनांना चिमटा; ‘पुन्हा तुमचा उमेदवार बदलू नका’

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांसह वंचित बहुजन आघाडी समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात परस्पर समन्वय नसल्यास प्रचारात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. या नेत्यांकडून महायुतीच्या अथवा भाजपच्या उमेदवाराला लाभ होईल, अशी विधाने केली जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी या बैठकीत सविस्तरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संवाद देखील साधला. कार्यकर्ते अथवा नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर असलेला वाद निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम करू शकतो. या भीतीने महाविकास आघाडीचे नेते ग्रस्त आहेत. त्यामुळे या नेत्यांनी पक्षांत आणि नेत्यांविषयी राग असल्यास स्पष्टपणे सांगा, प्रश्न विचारा, त्याचे निरसन करण्यात येईल. मात्र त्याचा राग उमेदवारावर काढू नका. उमेदवारावर राग काढल्यास आपल्याला निवडणूक जिंकणे सोपे राहणार नाही, असे या वेळी नेत्यांनी स्पष्ट केले.

Mahavikas Aghadi Leader
Sangola Politics : आणखी एका पुतण्याचं काकांविरोधात बंड; शहाजीबापूंचा पुतण्या जाणार शरद पवारांसोबत...

जळगाव जिल्ह्यातील तीनही पक्षांमध्ये जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर मोठी ओढाताण आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय कसा निर्माण करायचा, हे मोठे आव्हान महाविकास आघाडीला अस्वस्थ करीत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच नेते सावध झालेले दिसत आहेत. त्यामुळे आगामी काही काळ महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण करण्यावर आघाडीला काम करावे लागेल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. विष्णू भंगाळे, शरद तायडे, विराज कावडिया, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनील महाजन, अशोक लाडवंजारी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, लीलाधर तायडे यांचा विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Leader
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक, बीडमध्ये दाखवले काळे झेंडे अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com