Gokul Dudh Sangh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : गोकुळ’वर धडकणार मोर्चा, निवडणुकीच्या सहा महिनेआधीच रान पेटणार?

Gokul Milk Union debenture issue Kolhapur milk union protest : पुन्हा एकदा संस्थाचालकांचे डीबेंचर रक्कम अधिकची कपात झाल्यानंतर महाडिक गट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सक्रिय झाला आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) पंचवार्षिक निवडणूक पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळावर बोट ठेवत यापूर्वी महाडिक गटाने सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र महायुतीचे अध्यक्ष झाल्यानंतर महाडिक गटाच्या विरोध कमी झाली होती. पुन्हा एकदा संस्थाचालकांचे डीबेंचर रक्कम अधिकची कपात झाल्यानंतर महाडिक गट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सक्रिय झाला आहे.

डिबेंचर रक्कम परत करावी, या मागणीसाठी ‘गोकुळ’ संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील दूध संस्था व दूध उत्पादक आपल्या गायी व म्हशींसह शासकीय विश्रामगृहापासून ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आज त्या संदर्भात कावणे येथील केंदारलिंग दूध संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील आणि भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या दूध फरक बिलातून डिबेंचर्सची रक्कम अन्यायकारक आणि संस्थांना विश्वासात न घेता कपात केली आहे. सुमारे 40 टक्क्यांपर्यंत ही रक्कम कपात केली असून, प्राथमिक संस्थांच्या संमतीशिवाय कपात केली आहे. त्यामुळे काही संस्था चालकांमध्ये गोकुळ दूध संघ प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. ही रक्कम परत मिळावी अशी मागणी काही संस्था चालकांनी घेत या मोर्चाचे आयोजन केले आहे.

गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी संघाकडे 512 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे सांगितले होते. जर संघाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःच्या ठेवी असतील, तर प्राथमिक दूध संस्थांच्या फरक बिलातून डिबेंचर्स स्वरूपात रक्कम कपात कशासाठी केली. संघ फायद्यात आहे, तरीही ही रक्कम कपात केली जात आहे. अशी माहिती प्रवीण पाटील यांनी दिली.

गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी संचालक गोडबोले यांची भेट घेऊन कपात केलेली रक्कम परत मागितली होती. त्यानंतर गोडबोले यांनी यू-टर्न घेत चुकीचे वक्तव्य करून दूध संस्थांची दिशाभूल केली. त्यामुळे मोर्चाचे नेतृत्व संचालिका शौमिका महाडिक यांनी करावे, अशी विनंती दूध संस्था प्रतिनिधी मंडळाकडून केली आहे.

'दूध संस्थांना डिबेंचर्सची रक्कम परत दिली पाहिजे, ही दूध उत्पादकांची रास्त मागणी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे निवेदन देण्यासाठी आपणही जाणार आहे. हा मोर्चा म्हणून नव्हे, तर दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT