Jaykumar Gore and Ramraje Naik Nimbalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : एकमेकांवर तुटून पडणाऱ्या कट्टर विरोधकांमध्ये जाहीर व्यासपीठावर दिलखुलास गप्पा; शिवेंद्रराजेंचा पुढाकार

Jaykumar Gore and Ramraje Naik Nimbalkar News : राजकीय विरोधक असलेले मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर जाहीर व्यासपीठावर दिलखुलास गप्पा मारताना दिसले. नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांच्या संवादामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ओंकार कदम

Satara, 29 October : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील सख्य संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. नेहमी एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन्ही नेते जाहीर व्यासपीठावर एकत्र गप्पा मारताना दिसून आले. समोर महायुतीच्या नेत्याचे भाषण सुरू असताना या दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या, त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने महायुतीतील घटक पक्षांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यात कट्टर विरोधक गोरे आणि रामराजेंमध्ये गप्पा रंगल्या होत्या.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मेळावा आयोजित केला हेाता. त्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि भाजप नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अनेक वर्षांनंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते.

दोन्ही नेत्यांमध्ये व्यासपीठावर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दिलखुलास गप्पाही रंगल्या. विशेष म्हणजे सुरुवात रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून झाल्याचे दिसून येत आहे. गोरे आणि रामराजे हे अत्यंत दिलाखुलासपणे चर्चा करताना दिसून आले.

विशेष म्हणजे त्यांच्या बाजूला मंत्री मकरंद पाटील हे देखील उपस्थित होते. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा केलेला हा यशस्वी प्रयत्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT