

Amravati, 29 October : अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक बंडखोर आणि अपक्षांच्या भूमिकेमुळे गाजली. अपक्ष आणि ताकदवान बंडखोरांमुळे शिवसेनेचे किरण सरनाईक अडचणीत असल्याची चर्चा असतानाच त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. शिंदेसेनेचे बंडखोर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनाही पराभूत व्हावे लागले. पराभूत झाल्यानंतर प्रचंड संतापलेल्या देशपांडेंनी शिक्षकांची लायकी काढत ‘जशी लायकी तसा त्यांना प्रतिनिधी मिळतो,’ असा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रा. आदिती पोहेरे यांचा पराभव करत विजय मिळविला आहे. शिंदेसेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत देशपांडे यांना ७ हजार १७ मतं मिळाली आहेत.
माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. पराभव झाल्यावर देशपांडे हे हतबल झाल्याचे दिसून आले. त्यातूनच त्यांनी संतापच्या भरात शिक्षकांची लायकी काढली. शिक्षकांची कीव करावीशी वाटते. पैठणी अन् पैशांवर शिक्षकांनी मतदान केलं, असा गंभीर आरोप पराभूत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी केला.
पराभवामुळे संतापलेल्या माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी थेट शिक्षकांची लायकीच काढली. ते म्हणाले, जशी लायकी तसा त्यांना प्रतिनिधी मिळतो. देशपांडे यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील केवळ 7 हजार लोकच प्रामाणिक राहिले आहेत. बाकी लोकांचं काय, बाकी सगळ्यांनी त्यांची मतं विकली, याचं वाईट वाटतं, अशी खंतही देशपांडे यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे.
या मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवाराला शुभेच्छाही श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या आहेत. मात्र, संतापाच्या भरात त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.