Sadabhau Khot, Praveen Darekar, Prasad Lad, Vinayak Mete
Sadabhau Khot, Praveen Darekar, Prasad Lad, Vinayak Mete sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सदाभाऊंचा पत्ता कट; दरेकर, लाड, मेटेंची आमदारकी फिक्स?

सरकारनामा ब्यूरो

सांगली : माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात संघटना मजबूतीकरण, शेतकरी प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेण्यासह पुस्तकांचे लेखन पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपसोबत (BJP) युती केल्यानंतर खोत यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्यांच्याकडे कृषी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यासोबत त्यांचे खटके उडाले होते. शेट्टींनी युती तोडली. मात्र, सदाभाऊ मंत्रीपदासह भाजपसोबतच राहिले. तो सहा वर्षांचा काळ संपला.

आता विधान परिषदेसाठी निवडणूक लागणार आहे. त्यात भाजपला संख्याबळानुसार चार जागांवर संधी मिळेल. विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad), शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे (Vinayak Mete) व एका महिला सदस्याला संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहे. त्यात प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडचा त्याग करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांची नावे आघाडीवर आहेत. या गर्दीत सदाभाऊंना 'थोडी विश्रांती' देण्याचा विचार भाजपने केला असल्याचे सांगितले जात आहे. त्याची कल्पना खोत यांनाही देण्यात आली आहे. त्यांनी ती मान्यही केल्याचे समजते.

विधान परिषदेची पुढची निवडणूक दोन वर्षानंतरच होणार आहे. तो पर्यंत सदाभाऊंना प्रतिक्षा करावी लागेल किंवा घरच्या मैदानात एक तर लोकसभेला राजू शेट्टीं यांच्या विरोधात किंवा विधानसभेला जयंत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकावा लागेल. तूर्त सदाभाऊंनी भाजपने घेतलेल्या भूमिकेचा सन्मान करत विधान परिषद न लढवण्याचे ठरवले, असल्याचे संकेत दिले आहेत.

''विधान परिषदेची निवडणूक महिनाभरात लागेल. पक्षाचे जे काही धोरण असेल ते मान्य आहे. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी आतापर्यंत विधान परिषदेत लढा दिला. रस्त्यावरची लढाई कायम राहील, असे खोत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT