मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंच्या विरोधात कॉग्रेस आमदाराची सुप्रीम कोर्टात याचिका

हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ती पक्षाची भुमिका नाही.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. त्याच कारण आहे कॉग्रेसच्या एका माजी मंत्र्यांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकी प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे माझ्या मतदार संघात आले. यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ती पक्षाची भुमिका नाही असे या नेत्याने म्हटले आहे. २० ऑक्टोबर २०१९ रोजी ही घटना घडली होती. उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब, अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी प्रचाराची वेळ संपल्यानंतर मतदार संघात प्रचार केल्याचा आरोप खान यांनी याचिकेत केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात कॉग्रेसचे माजी मंत्री,आमदार नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ''मागील निवडणुकीत प्रचार संपला. मात्र, प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आपल्या मतदारसंघात आले होते,'' असा आरोप नसीम खान यांनी केला.

Uddhav Thackeray
'खडसेंकडून आघाडीत मीठाचा खडा', शिवसेना आमदार करणार खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

याबाबत नसीम खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर या प्रकाराविरोधात दाद मागण्यासाठी नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

नसीम खान यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे माझ्या मतदार संघात आले. यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ती पक्षाची भुमिका नाही.

Uddhav Thackeray
'मातोश्री'ला २ कोटी ; जाधवांच्या 'डायरी'वर फडणवीसांनी केली ही नोंद

सहा दिवसापूर्वी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar)यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. "आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, लाभ घेतं पवार सरकार", असं म्हणत शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रत्नागिरीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नाही. शिवसेनेवर अन्याय होतोय अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com