Solapur, 27 August : सोलापुरातील कोणताही विडी उद्योग स्थलांतरित होणार नाही किंवा बंद होणार नाही. विडी उद्योजक मालक आणि कामगार संघटना यांच्या भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्यापुढे मांडल्या जातील. त्यातून सकारात्मक मार्ग काढला जाईल. कारखाने स्थलांतरित करणार किंवा बंद करणार असल्याचा संदेश समाजात पसरवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन थकबाकी देणे व त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर तसेच विडी कारखानदार व व्यवस्थापक उपस्थित होते.
किमान वेतन अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, उद्योजकांनी आपले म्हणणे लेखी निवेदनाद्वारे सादर करावे. कामगार संघटनांकडून त्यांच्या मागण्या/निवेदने घेऊन त्याही सरकारदरबारी योग्यरित्या मांडून यावर ठोस तोडगा काढण्यात येईल.
अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग अभय गीते यांनी प्रकरण योग्य दिशेने सोडवण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच, या वेळी विडी कारखानदारांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यात आल्या.
विडी कारखानदारांच्या दबावाला बळी पडू नका
सोलापूर : विडी कारखानदार मालक कारखाने बंद करून तेलंगणाला स्थलांतर करू अशी धमकी देऊन महिला विडी कामगारांना सरकारने जाहीर केलेल्या किमान वेतनापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी महिला विडी कामगारांनी विडी कारखानदारांच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन विडी कामगार किमान वेतन समितीने कामगारांच्या मेळाव्यात केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.