Prashant Paricharak : फडणवीसांच्या भेटीनंतर महिनाभरातच प्रशांत परिचारकांना भाजपत मानाचे पान; निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका असणार

Solapur BJP Core Committee : भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना प्रथमच सोलापूर जिल्हा कोअर कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे परिचारकांचे पक्षातील राजकीय वजन वाढल्याची चर्चा असून २०२९ निवडणुकीसाठी निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
Prashant Paricharak
Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 27 August : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात साईडलाईनला पडलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांना प्रथमच पक्षाच्या सोलापूर जिल्हा कोअर कमिटीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिचारक यांचे भाजपमध्ये राजकीय वजन वाढल्याची चर्चा असून आगामी 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिचारिकांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर भेटीनंतर अवघ्या महिनाभरातच सोलापूर जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची असलेल्या भाजप कोअर कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे कोअर कमिटीमध्ये स्थान मिळालेले प्रशांत परिचारक हे एकमेव माजी आमदार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे स्थान मोठे आहे. ते अनेक सहकारी संस्थांवर काम करत आहेत. मागील विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशांत परिचारक हे भाजपकडून इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना संधी दिली नाही, त्यामुळे परिचारक हे काहीसे पक्षात नाराज असल्याचे चित्र होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडेच पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रशांत परिचारकांना योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल, असे सूचक विधान केले होते‌. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच प्रशांत परिचारक यांची सोलापूर जिल्हा भाजप कोअर कमिटीमध्ये निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Prashant Paricharak
BJP Core Committee : देशमुख, कल्याणशेट्टी, आवताडेंसह 11 जणांवर भाजपने सोपवली महत्वपूर्ण जबाबदारी; मात्र 15 महिने विलंबाची चर्चा

आगामी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारकांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे त्यांच्या निवडीची सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत परिचारक यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. पंढरपूर-मंगळवेढ्यातून परिचारकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. त्याचे बक्षीस म्हणून पक्षाने त्यांना कोअर कमिटीत काम करण्याची संधी दिली आहे.

Prashant Paricharak
Cabinet Minister Resignation : भाजपच्या दबावापुढे काँग्रेस झुकणार? दुसऱ्यांदा राजीनाम्याच्या तयारीत असणार्‍या कॅबिनेट मंत्र्याबाबत स्पष्ट इन्कार

त्यांच्यासोबत मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, आमदार सुभाष देशमुख यांचाही कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com