Karthikeyan s. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Collector Order To BLO : बीएलओंना जिल्हाधिकाऱ्यांची सक्त ताकीद : ‘मतदारांना तुमच्याकडे बोलावू नका; तुम्ही त्यांच्या घरी जा’

SIR Campaign News : एसआयआर मोहिमेत बीएलओंनी मतदारांना बोलावण्याऐवजी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 09 July : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या एसआयआरची मोहिम वेगात सुरू आहे. या मोहिमेत बीएलओ यांनी मतदारांच्या घरी जाणे अपेक्षित आहे. काही बीएलओ एका ठिकाणी बसून त्या ठिकाणी मतदारांना बोलवत आहेत. मतदारांना तुमच्याकडे बोलवू नका, तुम्ही मतदारांच्या घरी जा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बीएलओंना दिल्या आहेत.

दरम्यान, बीएलओची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना त्या शाळेतील इतर शिक्षकांनीही सहकार्य करावे (अध्यापन आणि बीएलओच्या कामासाठी), असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ३९ लाख ४१ हजार मतदारांपैकी २४ लाख ६८ हजार मतदारांना आतापर्यंत गणनापत्रकाचे वाटप करण्यात आलेले आहे. वाटप झालेल्या गणनापत्रकापैकी ८ टक्के गणनापत्रक ऑनलाईनवर अपलोड करण्यात आले आहेत, असेही कार्तिकेयन यांनी सांगितले.

एसआयआरमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर राज्यात दहाव्या क्रमांकावर आहे. या मोहिमेच्या सुरवातीच्या टप्प्यात काही अडथळे होते, आता बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. आता एसआरएच्या कामाने वेग घेतला आहे, अशी माहितीही जिल्हधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले,ज्या शाळेतील शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्या शाळांतील शिक्षकांना या कामासाठी मुक्त करण्यात यावे, काही ठिकाणी शिक्षकांची कमतरता असेल तर अशा शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रही काढले आहे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी लवकरच पत्र काढणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT