Maharashtra Politic's : मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत : पवारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंशी अर्धा तास चर्चा...

Eknath Shinde-Ravindra Chavan Meeting : शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही शिंदेंसोबत अर्धा तास राजकीय चर्चा केली. या घडामोडींमुळे राज्यातील नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना वेग आला.
Eknath Shinde-Ravindra Chavan
Eknath Shinde-Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 09 July : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले असताच आज पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पवार-शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या भेटीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र प्रवास करत अर्धा तास राजकीय विषयावर चर्चा केली, त्यामुळे नव्या राजकीय घडामोडीचे स्पष्ट संकेत मिळत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर बुधवारी (ता. ०८ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीला माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी हजेरी लावली. बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनाला भेट दिली.

त्या वेळी एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. पवार हे आपल्या दालनात आल्याची माहिती मिळताच शिंदे हे मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडून पवारांच्या स्वागतासाठी आले होते. त्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. खरं तर चव्हाण आणि शिंदे हे एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांच्यातील राजकीय वाद अनेकदा दिसून आलेला आहे.

Eknath Shinde-Ravindra Chavan
Poster Controversy : पुण्यात पालखी पोस्टरवरून नवा राजकीय वाद; मोदींसोबत फक्त फडणवीस, सुनेत्रा पवार अन् शिंदे फोटोंमधून गायब!

नगरपालिका, महापालिका आणि झेडपी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमधील राजकीय स्पर्धेमुळे दोघांमध्ये अनेकदा कटुता आल्याचे दिसून आले आहे. मात्र, हेच दोन नेते आज एकाच गाडीतून विधीमंडळात दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde-Ravindra Chavan
Solapur DPC : डीपीसीतील मनमानीला चाप बसणार : विकासकामांची सद्यःस्थिती दोन आठवड्यांत सादर करा, इस्लामपूर ग्रामपंचायतीच्या याचिकेवर कोर्टाचे निर्देश

या दोघांसमवेत प्रवासात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भूमरेही होते. पवार शिंदे भेट आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा शिंदेंसोबतचा एकत्रित प्रवास यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com