Raj Thackeray-Sanjay Shirsat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray VS Shirsat : शिरसाटांचा राज ठाकरेंना टोला; मराठीचा पुळका फक्त एकाच पक्षाला अन्‌ आम्ही काय हिंदी भाषिक आहोत का?

Marathi School Issue : मराठी शाळा बंद होण्यामागे जमीन हडपण्याचे कारस्थान असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत मनसे-शिवसेना वाद अधिकच तीव्र केला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 30 April : मराठी शाळा बंद पडण्यामागे मोक्याच्या जमिनी हडपण्याचे राजकीय कारस्थान आहे, असा गंभीर आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. त्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. ‘मराठीचा पुळका फक्त एकाच पक्षाला आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असं समजण्याचं काही कारण नाही,’ असा टोला शिरसाट यांनी राज ठाकरेंना लगावला.

सामाजिक न्यायमंत्री शिरसाट हे आज सोलापूर दौऱ्यावर असून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठी शाळा बंद पडण्याच्या मुद्यावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट ( Sanjay Shirsat) म्हणाले, मराठी शाळा बंद करणे, हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. मराठी टिकली पाहिजे, ती केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ती तशीच राहिली पाहिजे. मराठीच्या स्वाभिमानाला कोणीही ठेच पोहोचवू नये.

मराठीचा पुळका फक्त एकाच पक्षाला आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे समजण्याचे काही कारण नाही. मराठीसाठी लढा द्यायला आम्हीदेखील तयार आहोत, असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

महाराष्ट्रात मराठी शाळा राजकीय नेते विकतात कसे? हा शाळांचा विषय नाही, तर हा जागांचा विषय आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांवर कुणाचे तरी लक्ष आहे. त्याशिवाय मंत्रालयात कोणतीही फाईल हलत नाही. कुणाला तरी त्या जागा हव्या आहेत, असे राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.

संघ कार्यालयाच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर कार्यालयास आलेल्या धमकीबाबत शिरसाट म्हणाले, संघ कार्यालयाची सुरक्षा ही केंद्र आणि राज्य सरकार, या दोघांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे कोणताही धोका असल्याचे कारण नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT